Reserve Bank of India (RBI) ने आता जुन्या नोटा आणि नाण्यांबाबत केले सतर्क, जर तुम्ही सुद्धा केली अशी चूक तर होऊ शकते मोठे नुकसान ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Reserve Bank of India (RBI) वेळोवेळी आपल्या ग्राहकांशी संवाद साधते. यासोबतच बँकांना सूचनाही देत असते. अशाच प्रकारे रिझर्व्ह बँकेने लोकांना आणखी एक इशारा दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सायबर गुन्ह्यांपासून (Cyber Crimes) सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. कारण सायबर गुन्हेगार अनेकदा आकर्षक अमिष दाखवून लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. Reserve Bank of India (RBI)

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लोकांना जुन्या नोटा आणि नाणी (Old Notes And Coins) खरेदी किंवा विक्रीच्या ऑफरला बळी पडण्यापासून सावध केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटमध्ये आरबीआयने म्हटले आहे की, काही घटक भारतीय रिझर्व्ह बँकेचे नाव आणि चिन्ह चुकीच्या पद्धतीने वापरत आहेत आणि विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मद्वारे लोकांना जुन्या नोटा आणि नाणी विकण्यास सांगत आहेत. Reserve Bank of India (RBI)

 

ज्याद्वारे फसवणूक करणारे शुल्क, कमिशन किंवा कर वसूल करत आहेत.
रिझर्व्ह बँक असे कोणतेही काम करत नसल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.
तसेच आरबीआय कधीही कमिशन किंवा कर आकारत नाही. लोकांनी अशा प्रकारचे प्रस्ताव किंवा खोट्या गोष्टींना कधीही फसू नये. अन्यथा, यामुळे ते पैसे गमावू शकतात. (RBI Alert)

 

कमिशन वसूल करण्याचा कोणालाही दिला नाही अधिकार

याबाबत अधिक माहिती देताना बँकेने म्हटले की, रिझर्व्ह बँकेने कोणत्याही व्यवसाय, कंपनी किंवा व्यक्तीला लोकांकडून असे कोणतेही शुल्क, कमिशन घेण्याचा अधिकार दिलेला नाही.
अशी कोणतीही माहिती तुमच्या समोर आल्यास तुम्ही सावध व्हा.
तसेच तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता.

 

Web Title :- Reserve Bank of India (RBI) | rbi has now alerted over old notes and coins if you also made such a mistake then can be a big loss

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा