Reserve Bank of India । नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 3 सहकारी बँकांवर RBI ची कारवाई; बारामती अन् इंदापूरच्या बँकेचा समावेश

मुंबई न्यूज  : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online)-  RBI । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 3 सहकारी बँकांवर (Cooperative Banks) कारवाई केली आहे. कारवाई करत 23 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून  याअगोदर देखील काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तर ज्या 3 RBI ने दंड ठोठावला आहे. त्यात मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Mogaveera Co-operative Bank), इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Indapur Urban Cooperative Bank) आणि बारामती सहकारी बँक लिमिटेड (Baramati Sahakari Bank) या बँकेचा समावेश आहे. Reserve Bank of India | rbi takes action against 3 banks fined rs 23 lakh including baramati and indapur sahakari bank

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 3 बँकेला ठोठावण्यात आलेला दंड म्हणजे, मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँकेवर 12 लाख रुपये, इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर 10 लाख रुपये आणि बारामती सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान, या तीन बँकेवर वेगवेगळ्या कारणास्तव RBI ने कारवाई केलीय केली आहे.

1. मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँक –

मोगावीरा को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत (Mogaveera Co-operative Bank) RBI ने म्हटलं आहे.
की, आर्थिक परिस्थितीच्या आधारे बँकेच्या तपासणी रिपोर्टमध्ये असं स्पष्ट समोर आलं आहे.
की, डिपॉझीटर एज्युकेशन अँड अवेयरनेस (DEA) ने फंडामध्ये पूर्ण हक्क न भरलेली ठेव हस्तांतरित केला नव्हती अथवा निष्क्रिय खात्यांचे वार्षिक पुनरावलोकन केले नाही.
याशिवाय या बँकेची सर्व खात्यांच्या जोखमीच्या वर्गवारीचा आढावा घेण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नाही.
यामुळे या बँकेवर दंड ठोठावला आहे.

2. इंदापूर नागरी सहकारी बँक –

पुणे येथील इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत (Indapur Urban Cooperative Bank) RBI बँकेने म्हटलं.
की, या बँकेमधील तपास अहवालानुसार आणि 31 मार्च 2019 पर्यंत बँकेने एकूण असुरक्षित आगाऊ कमाल मर्यादेचे पालन केले नाही.
तसेच बँकेनी वेळोवेळी सर्व खात्यांच्या जोखमीच्या वर्गवारीचा आढावा घेण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही.
ज्यावेळी ग्राहकांच्या जोखीम श्रेणीमध्ये विसंगत व्यवहार होतो.
त्यावेळी सतर्कता देणारी मजबूत यंत्रणा बँकेकडे नव्हती.
म्हणून यावर कारवाई केली आहे.

3. बारामती सहकारी बँक –

बारामती सहकारी बँकेला (Baramati Sahakari Bank) दुसर्‍या बँकेत केलेल्या व्यवहारात प्रूडेंशियल इंटर-बँक एक्सपोजर (Prudential inter-bank exposure) मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करत दंड ठोठावण्यात आला आहे.
नियामक पालनाच्या अभावाचे कारणामुळे या 3 सहकारी बँकांवर दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे RBI ने सांगितलं आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सांगितलं आहे.
की, प्रत्येक बाबतीत नियामक अनुपालनातील त्रुटींमुळे दंड आकारण्यात आला आहे.
आणि आपल्या ग्राहकांशी झालेल्या कोणत्याही व्यवहाराची अथवा कराराची वैधता रोखण्याचा कोणताही निर्णय बँकेने घेतला नसल्याचं RBI ने सांगितलं आहे.

Web Title : Reserve Bank of India | rbi takes action against 3 banks fined rs 23 lakh including baramati and indapur sahakari bank

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LIC पॉलिसीधारकांनो, 30 जूनपूर्वी ‘हे’ काम पूर्ण करा