Reserve Bank of India | ‘RBI’ ची मोठी कारवाई ! ग्राहकांना महाराष्ट्रातील ‘या’ बँकेतून फक्त 1 हजार रुपयेच काढता येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Reserve Bank of India | सोलापूरच्या लक्ष्मी सहकारी बँकेची (Lakshmi Sahakari Bank) डबघाईला आलेली स्थिती बघता भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) मोठं पाऊल उचललं आहे. आरबीआयने (RBI) या बँकेवर निर्बंध लावले आहेत. पैसे काढते वेळी काही लिमिट लावण्यात आले आहेत. या निर्बंधानूसार बँकेच्या ग्राहकांसाठी त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा 1 हजार रुपये निश्चित केली आहे.

 

बँकिंग नियमन कायदा 1949 अंतर्गत लादलेले निर्बंध 12 नोव्हेंबर 2021 रोजी कामकाजाचे तास बंद झाल्यानंतर 6 महिने लागू राहतील.
यादरम्यान निर्बंधांचा आढावा घेतला जाईल. असं RBI ने (Reserve Bank of India) शुक्रवारी एका निवेदनात स्पष्ट केलं आहे.
तर, लक्ष्मी सहकारी बँक, मध्यवर्ती बँकेच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही अथवा कर्जाचे नूतनीकरण करू शकणार नाही.
बँक कोणतीही गुंतवणूक करणार नाही किंवा कोणतेही पैसे देणार नाही किंवा पेमेंट करण्यास संमती देणार नाही.
खरंतर सर्व बचत बँक अथवा चालू खाती किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेच्या 1 हजार रुपये काढण्याची मर्यादा असल्याचं RBI ने सांगितलं.

दरम्यान, ज्या ग्राहकांच्या खात्यातून कर्जाचा हप्ता कापला जातो, त्यांना अटींनुसार तो सेटल करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
बँकेवर निर्बंध लादले म्हणजे बँकिंग परवाना रद्द झाला असे मानू नये.
बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहील.
असंही RBI ने सुचित केलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने यवतमाळमधील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवरही
(Babaji Date Mahila Sahakari Bank) कारवाई केली होती.
त्यामुळे ग्राहकांना बँकेतून फक्त 5000 रुपयांचीच रक्कम काढता येणार आहे.
यवतमाळची ही सहकारी बँक आता रिझव्‍‌र्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही पेमेंट किंवा कर्ज किंवा आगाऊ रक्कम देऊ शकत नाही.

 

Web Title : Reserve Bank of India | Reserve Bank of India take action agaisnt laxmi co operative bank in solapur maharashtra customers can withdraw only 1000 rs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sameer Khan Case | नवाब मलिकांचे जावई समीर खान यांच्या अडचणी वाढणार? एनसीबीचा NDPS न्यायालयात अर्ज

UPSC Recruitment 2021 | भारत सरकारच्या विविध विभागात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, पगार देखील लाखात

ST Workers Strike | ‘विलीनीकरणाची मागणी मान्य होऊ शकत नाही’