RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासंदर्भात दिला सल्ला; म्हणाले…

नवी दिल्ली : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही शहरात तर पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. असे असताना याच मुद्द्यावरून भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यावर भाष्य केले. त्यामध्ये ते म्हणाले, पेट्रोल-डिझेलवर लागू करण्यात आलेल्या टॅक्समध्ये कपात करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

गेल्या दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यावर पेट्रोल-डिझेलवर लावण्यात येणाऱ्या टॅक्समध्ये कपात करावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. त्यानंतर याच मुद्यावरून शक्तिकांत दास यांनी टॅक्समध्ये कपात करावी, असे सांगितले. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे आवाहन केले, की अप्रत्यक्ष टॅक्समध्ये कपात करावी. असे केल्यास पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करता येऊ शकते. तसेच टॅक्समध्ये हळूहळू कपात करणे गरजेचे आहे.

पेट्रोल-डिझेलचा GST मध्ये समावेश करावा

पेट्रोल-डिझेलचा समावेश GST मध्ये करण्याची मागणी केली जात आहे. सध्या पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार एक्साईज ड्युटी आणि राज्य सरकार व्हॅट लावते. तर काही ठिकाणी ट्रान्सपोर्ट आणि लोकल बॉडी टॅक्समुळे (LBT) पेट्रोलचे दर आणखीच वाढतात. त्यामुळे GST मध्ये समावेश झाल्यास एकच टॅक्स लागू शकतो.