काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अमित विलासराव देशमुख यांच्या नावाची चर्चा !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसापासून राज्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यावरून काँग्रेसमधील वातावरण तापले होते. नव्या दमाचा आणि काँग्रेस वाढीचे आव्हान पेलणाराच नेता प्रदेशाध्यक्षपदी असावा तशीच कार्यर्त्याची मागणी होती. त्यापार्श्वभूमीवर आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. नुकताच त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या रिक्त जागेवर आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांची वर्णी लागणार आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचेही नाव पुढे आले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची माल कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेसची झालेली वाताहत रोखण्यासाठी पक्षांतर्गत मोठे बदल करावे लागणार आहे. त्यासंदर्भात असनेक दिवसापासून चरचा सुरु होती.

पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची मागणी केल्याचे समजते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पटोले यांचा मंत्रिमंडळात समावेश करून पाडवी यांना विधानसभेचे अध्यक्षपद द्यायचे. यानिमित्ताने आदिवासी समाजाला पहिल्यांदाच विधानसभेच्या अध्यक्षपदाचा मान दिला जाईल. दरम्यान, काँग्रेसने उपमुख्यमंत्री पद मागितल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यावर राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना विधानसभाध्यक्षपद काँग्रेसला देण्याचा एकमताने निर्णय झाला होता, त्यामुळे त्यात बदल होणार नाही. राज्यातील काँग्रेसमध्ये चव्हाण आणि बाळासाहेब थोरात असे दोन गट आहेत. पटोले यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद द्यायचे आणि मंत्रिपद द्यायचे की, की फक्त मंत्रिपद द्यायचे? यावर खल सुरू आहे. अमित देशमुख यांना मंत्रिपद आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद द्यावे, अशीही मागणी पुढे आली आहे. वास्तविक हि मागणी करताना तीन पक्षांचे सरकार चालवताना आक्रमकपणा अडचणीत आणणारा ठरू शकतो. त्यामुळे पटोले यांच्या तुलनेत अमित देशमुख कमी आक्रमक आहेत. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. दुसरीकडे चव्हाण गटाला अमित देशमुख नको आहेत तर थोरात यांना अमित प्रदेशाध्यक्ष झाले तर चालतील, अशी परिस्थिती आहे.

तिन्ही पक्षांना मान्य नेता
राज्यात तीन पसखांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे राहील, असा निर्णय झाला होता. त्यामुळे काँग्रेस हे पॅड कोणाला द्यायचे हे ठरवणार असले तरी तिन्ही पक्षाला मान्य असलेले नाव पुढे येईल. विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव होते. पण पाडवी आदिवासी समाजाचे नेते आहेत, कोणीही विरोध करणार नाही. दुसरीबाजू म्हणजे महाविकास आघाडी सरकारने आदिवासी समाजाच्या नेत्याला विधानसभेचे सर्वोच्च पद दिले, असा संदेशही देता येईल अशी चर्चा आहे.