चित्रीकरणास विरोध केल्यामुळे कूपर रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाबाधित रुग्णाला भेटायला आल्यानंतर रुग्णालयात चित्रकरणास विरोध केल्याचा राग आल्यामुळे रूग्णाच्या नातेवाईकांनी कूपर रुग्णालयात एका निवासी डॉक्टरला मारहाण केली आहे. डॉक्टरांवरील मारहाण रोखण्यासाठी कायदा केला असला तरी रुग्णालयात पुरेशी सुरक्षा नसल्याने मारहाणीचे सत्रा, सुरू असल्याचे निवासी डॉक्टरांनी घटनेविरोधात निषेध व्यक्त केला आहे.

कूपर रुग्णालयात विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाला भेटण्याची मागणी करीत दोन महिलांसह काही नातेवाईक थेट विलगीकरण कक्षात शिरले. त्यांनी कक्षामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केले. यावेळी उपस्थित औषधशास्त्र विभागातील निवासी डॉक्टरांनी त्यांना असे करण्यास मज्जाव केल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. दोन महिलांनी डॉक्टरवर हल्ला करीत हाताचा चावा घेतला असून मान, हातावर या नातेवाईकांनी नखे ओरबडल्याचे निवासी डॉक्टरांनी सांगितले. ही घटना घडली तेव्हा विलगीकरण कक्षाच्या बाहेर एक वृद्ध महिला सुरक्षा रक्षक तैनात केली होती.

तिला धुडकावत नातेवाईक थेट रुग्णालयात शिरले. रुग्णाच्या आणि नातेवाईकाच्या सुरक्षेसाठी विलगीकरण कक्षात जाण्यास मनाई केली आहे. मात्र रुग्णालयात पुरेसे सुरक्षा रक्षक नसल्याने आमची सुरक्षा वार्‍यावर असल्याचेही पुढे निवासी डॉक्टरांनी व्यक्त केले. या आधीही परिचारिकेला मारहाण झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी आंदोलन केले होते. यारप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी डॉक्टर रुग्णालयातही गेले होते. मात्र महिलांनी स्थानिक राजकीय व्यक्तींना बोलावून डॉक्टरांवर दबाव आणण्यास सुरूवात केली. त्यामुळे गुन्हा नोंद न करताच हे प्रकरण मिटवण्यात आले. परंतु रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरांना पाठिंबा देत कोणताही संस्थात्मक गुन्हा दाखल केलेला नाही.