पूजा चव्हाणला न्याय मिळण्याच्या प्रक्रियेतील पहिलं पाऊल; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   गेल्या काही दिवसापासून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवणारया पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं होत. मात्र, कित्येक दिवस त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही अथवा त्यांनीही केलेल्या आरोपांवर खुलासा केला. त्यातच या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान संजय राठोड यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने लावून धरली होती इतकाच नाही तर त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला होता, परंतु हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे चार दिवस उलटले तरी पाठवण्यात आला नाही, याबद्दल विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. अखेर गुरुवारी हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवण्यात आला त्यानंतर तो मंजूर होऊन नुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी दिली आहे.
या सर्व घडामोडींवर भाजप नेत्या चित्र वाघ यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर झाल्याची माहिती मिळाली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पूजाला न्याय मिळण्याच्या प्रक्रियेतील हे पहिले पाऊल आहे. सत्य समोर येईलच पण हा विषय फक्त एवढ्यापुरतां मर्यादीत नाही. हि लढाई सत्ता, पैशाच्या जोरावर समाजाची ढाल करून लढणाऱ्या महिलांचे आवाज दाबणाऱ्यांविरुद्धची आहे, असंहि चित्रा वाघ यांनी म्हंटल आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सोशल मीडियावर १२ कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या, या ऑडिओ क्लिपमुळे संजय राठोड यांच्या अडचणीत भर पडली. पूजाच्या आत्महत्येस संजय राठोड जबाबदार असल्याचा विरोधकांनी आरोप करत सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली. दुसरीकडे संजय राठोड यांनाही मौन बाळगले होते. त्यामुळे विरोधकांनी दबाव वाढवला होता. हळूहळू ठाकरे सरकारभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं. त्यातच पोहरादेवी गडावर संजय राठोड यांनी शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांच्याच आदेशाला केराची टोपली दाखवली. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर दबाव वाढवला अखेर संजय राठोड यांनी नैतिकतेच्या आधारे हा राजीनामा दिल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला स्पष्ट करण्यात आलं होतं.
या प्रकरणात रोजनवनवीन माहिती समोर येत असताना पूजाच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांनी थेट पूजाच्या आई वडिलांवर ५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर यापुढेही ते कधीही समोर येऊन संजय राठोड यांच्या विरोधात आवाज उठवणार नाही. आमची मुलगी आजारी होती आणि त्यानेच ती मेली असेच ते म्हणतील, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. यानंतर पूजाच्या वडील लहू चव्हाण यांनी शांताबाई राठोड यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.

आपल्या कुटुंबीयांवर पाच कोटी घेतल्याचे शांताबाई राठोड यांनी केलेले आरोप चुकीचे व खोटे आहेत. केवळ कुटुंबाची बदनामी करण्यासाठीच हे कारस्थान रचले आहे. त्यांनी सांगितले तसेच परळी शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी त्यांच्याविरुद्ध कलम ५००, ५०१, ५०२ भादंवि व कलम ६६ (अ) माहिती व तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी तक्रारहि लहू चव्हाण यांनी दिली. त्यावरून शांताबाई राठोड यांच्याविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.

लहू चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हंटले आहे की, काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी माझ्या मुलीची नाहक बदनामी केली जात आहे. त्यामुळे मी स्वतः २८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी योग्य ती कारवाई होईल, असे सांगितले आहे. शांता राठोड यांनी १ मार्च रोजी टीव्हीच्या माध्यमातून आमच्या मुलीशी काही संबंध नसताना स्वतःहून बदनामी करण्याच्या हेतूने खोटे आरोप केले आहेत, असं लहू चव्हाण यांनी म्हटलं आहे.

माझीही हत्या होईल: शांताबाई राठोड

गुम्हा दाखल झाल्याचे समजताच शांताबाई राठोड यांनी यावर पुन्हा भाष्य केलं त्या म्हणाल्या स्वतःच्या लेकरासाठी न्याय मागण्यासाठी गेला नाहीत. तुम्ही माझे रक्ताचे नातेवाईक आहात. माझ्यावर तक्रार दाखल झाली हे चुकीचे आहे. आता माझीही २ ते ३ दिवसात हत्या होण्याची शक्यता वाटते. उद्या जर माझया जीवाचे बरे वाईट झाल्यास पूजाच्या न्यायासाठी आवाज उठवावा असं आवाहन शांताबाई यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना केलं आहे.