मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा विरोध

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरीतील डॉ. डी.वाय.पाटील रूग्णालयात अॉक्सीजन संपल्यानंतरही रूग्णाकडे लक्ष न दिल्याने एका २४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यु झाला असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल करण्यात आला.

संदीप नवनाथ बनसोडे (25, रा. पिंपरी) असे मृत्यु झालेल्याचे नाव आहे. संदीप याला वेदना होत असल्याने डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अॉक्सीजन संपल्यानंतरही डॉक्टरने रूग्णाकडे लक्ष दिल नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. रात्री आकरा वाजल्यापासून नातेवाईक डॉक्टरवर करवाई करावी या मागणीसाठी बसून आहेत.

जाहिरात