हवेलीमधील मुदत संपलेल्या 47 ग्रामपंचायतींची जबाबदारी 9 विस्तार अधिकार्‍यांवर

थेऊर पोलिसनामा हवेलीतील मुदत संपलेल्या तब्बल 47 ग्रामपंचायतीची जबाबदारी केवळ नऊ विस्तार अधिकार्यावर असल्याने येत्या काळात प्रत्येक गावाला किती दिवस प्रशासक मिळणार याचा अंदाज गावकर्यांना येईना.

महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतीची मुदत ऑगस्ट महिन्यात संपली.कोरोना महामारीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आणि एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीवर प्रशासकीय अधिकारी नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीला हे प्रशासकीय अधिकारी जनप्रतिनिधीतून असावेत अथवा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती असावी अशा अटकली घडत गेल्या महाराष्ट्र शासनाने तसे अध्यादेश काढले परंतु यास सगळीकडूनच मोठा विरोध झाला या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या यावर उच्च न्यायालयाने प्रशासक म्हणून “क” वर्गातील अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले.

हवेली तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीची मुदत संपल्यावर येथे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त झाले याची यादी नुकतीच जाहिर झाली असून यामध्ये एस. आर. मोरे, एन. डी. कारंडे, एन एम. म्हेत्रे, डी. एच. म्हेत्रे, एन. के. धावटे, एम. पी. वाघमारे, डी. ए. खोसे, ए. डी. घोगरे आणि ए. एस. बागुल यांचा समावेश आहे.यातील बहुतांश विस्तार अधिकार्यावर पाच ग्रामपंचायतीची जबाबदारी देण्यात आली आहे. गावची लोकसंख्या आणि कोरोनाचा वाढत असलेला प्रभाव याचा विचार केला तर हे अधिकारी प्रत्येक गावावर कसे व किती लक्ष ठेवतिल हा प्रश्न आहे