Tiktok Blackout Challenge News : टिक टॉकवर ब्लॅकआऊट चॅलेंज खेळणार्‍या मुलीचा मृत्यू, इटलीत खळबळ

रोम : टिक टॉकवर (Tiktok ) कथित प्रकारे ब्लॅकआऊट चॅलेंज खेळताना झालेल्या दुर्घटनेत एका 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याने इटलीत खळबळ उडाली आहे. तेथील सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तर, अनेक संघटनांनी देशात सोशल नेटवर्क्सवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे.

बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत मिळाली मुलगी
मृत मुलगी आपल्या मोबाइल फोनसह बाथरूममध्ये बेशुद्ध मिळाली होती. मृत मुलीच्या 5 वर्षांच्या बहिणीने बुधवारी बाथरूममध्ये तिला बेशुद्धावस्थेत पाहिले होते. नंतर मुलीचा पलेरमो हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला होता. पोलिसांनी मृत मुलीचा फोन जप्त करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

टिक टॉकने जारी केले वक्तव्य
चीनची कंपनी बाइटडान्सच्या मालकीच्या टिक टॉकने शुक्रवारी सांगितले की, त्यांना तिच्या साइटवर असे कोणतेही कंटेट मिळाले नाही, ज्यामुळे म्हणता येईल की मुलगी अशा एखाद्या चॅलेंजमध्ये सहभागी झाली होती. कंपनीने म्हटले की, ते अधिकार्‍यांना तपासात मदत करत आहेत. टिक टॉकच्या प्रवक्त्याने म्हटले, टिक टॉक कम्युनिटीची सुरक्षा आमची प्राथमिकता आहे. ती पूर्ण करण्यासाठी आम्ही अशा कोणत्याही कंटेटला प्रोत्साहन देत नाही जो धोकादायक व्यवहारांना प्रोत्साहन देतो.

मुलीच्या वडीलांनी म्हटले – हे सर्व अनपेक्षीत होते
मेडिकल एक्सपर्ट्सने तरूणांद्वारे देण्यात येत असलेल्या धोकादायक चॅलेंजबाबत इशारा दिला आहे. मृत मुलीच्या आई-वडीलांनी ’ला रिपब्लिका’ या वृत्तपत्राला सांगितले की, त्यांच्या दुसर्‍या मुलीने सांगितले की, तिची मोठी बहिण ब्लॅक आऊट गेम खेळत होती. आम्हाला काहीही माहित नव्हते. ती या खेळात भाग घेत होती हे माहित नव्हते. आम्हाला केवळ एवढेच माहित होते की आमची मुलगी टिक टॉकवर डान्स आणि व्हिडिओ पहाते. आम्हाला अशा घटनेची अपेक्षा नव्हती.

मुलीच्या मृत्यूनंतर इटलीमध्ये संताप
मुलीच्या मृत्यूनंतर संपूर्ण इटलीत संताप आहे आणि लोक सोशल नेटवर्क्सवर निर्बंध आणण्याची मागणी करत आहेत. इटलीच्या चाइल्ड प्रोटेक्शन कमिशनच्या अध्यक्षा लिसा रोनजुली यांनी म्हटले, सोशल नेटवर्क्स असे जंगल बनू शकत नाही, जिथे सर्वकाही करण्याची परवानगी असेल.