Coronavirus : ‘कोरोना’चा हाहाकार ! जगभरात आतापर्यंत 5040 जणांचा मृत्यू, भारतात 82 लोकांना ‘लागण’

बिजिंग : वृत्तसंस्था – चीनमध्ये सुमारे तीन महीन्यापासून धुमाकूळ घातल्यानंतर या महामारीने जागतिक रूप धारण केले आहे. कोरोना व्हायरसने आतापर्यंत 5,000 पेक्षात जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात 1,34,300 पेक्षा जास्त लोकांना याचा संसर्ग झाला आहे. यामुळे भारतातही दोन मृत्यू झाले आहेत. सोबतच भारतात याचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 82 झाली आहे. अमेरिकेत कोरोना व्हायरस ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर झाली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असल्याने जगभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रूग्णालयांमधील रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, शाळा, कॉलेज, कार्यालय, स्टेडियम बंद करण्यात येत आहेत, तसेच याचा आर्थिक उलाढालीवर परिणाम होत आहे.

वेगाने पसरत आहे व्हायरस
कोविड-19 चा संसर्ग जगभरात वेगाने पसरत असल्याने प्रवासावर प्रतिबंद तसेच सोहळे स्थगित केले जाण्यासह विविध पावले उचलण्यात येत आहेत. हा प्रकोप लवकरच नियंत्रणात येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तींना या संसर्गाने ग्रासले आहे.

1.34 लाख लोकांना संसर्ग
अधिकृत सूत्रांकडून शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जगभरात कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे आतापर्यंत 5,040 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या आजारामुळे चीनमध्ये आतापर्यंत 3,176 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये 1,266 आणि इराणमध्ये 514 लोकांचा मृत्यू झाला आहे. डिसेंबरमध्ये कोविड-19 संसर्गांचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर 121 देशांमध्ये 1,34,300 पेक्षा जास्त लोकांना याचा संसर्ग झाला आहे.

देशात वाढले मृत्यू

तर इराणमध्ये वेगाने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना आदेश देण्यात आला आहे की, त्यांनी पुढील 24 तासांच्या आत देशातील रस्ते रिकामे करावेत. चीन, इटली आणि इराणनंतर स्पेन (120 मृत्यू, 4,209 प्रकरणे) आणि दक्षिण कोरिया (67 मृत्यू, 7,979 प्रकरणे) यामुळे जास्त प्रभावित झाले आहेत. जपानमध्ये 675 लोकांना याचा संसर्ग झाला आहे.

रोममधून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसला तोंड देण्यासाठी चीनचे तज्ज्ञ आणि अनेक टन वैद्यकीय मदत विशेष विमानाने इटलीला पाठवण्यात आली आहे. सूदान, यूक्रेन आणि नॉर्वेमध्ये या व्हायरसमुळे पहिला मृत्यू झाला आहे. घाना, केनिया, इथियोपिया, सेंट विन्सेन्ट आणि ग्रेनेडाइन्सने आपल्या भागात यापुर्वीच यास दुजोरा दिला आहे.

भारतात दोघांचा मृत्यू
भारतात कोरोना व्हायरसमुळे शुक्रवारी दुसरा मृत्यू झाला. सोबतच संसर्ग झालेल्यांची संख्या 82 झाली आहे. अमेरिकेत भारतीय दूतावासाने कोरोना व्हायरस पसरण्यापासून रोखण्यासाठी भारताद्वारे नुकत्याच लागू केलेल्या प्रवासबंदीबाबत प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. भारतात सरकारी विमान कंपनी एयर इंडियाने इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इस्रायल, दक्षिण कोरिया आणि श्रीलंकेसाठी असणारी उड्डाणे 30 एप्रिलपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रसिद्ध व्यक्तींनाही संसर्ग
इराणचे परराष्ट्रमंदी मोहम्मद जवाद जरीफ यांनी अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाला देशात अणू कार्यक्रमावर लावलेले प्रतिबंध ताबडतोब हटवण्याचे आवाहन केले आहे. या प्रतिबंधामुळे त्यांच्यासाठी औषधे आणि वैद्यकीय उपकरणे आयात करणे अवघड झाले आहे.

महामारीचे रूप धारण केलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रकोपातून जगभरातील विशेष व्यक्तीसुद्धा बचावलेल्या नाहीत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या पत्नीलासुद्धा या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. याशिवाय इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे सल्लागार अली अकबर विलायती यांच्यात कोरोना व्हायरसची लक्षणे आढळल्याने त्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे.

तर, ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो यांच्या प्रमुख सहायकाला कोरोनाची लागण झाली आहे. बोलसोनारोचे दूरसंचार प्रमुख फॅबियो वाझगार्टन यांना मागच्या आठवड्यात अमेरिकेच्या दौर्‍यानंतर कोविड-19 चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. अमेरिकेच्या दौर्‍यात दोघांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेतली होती.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी आपले सर्व कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूयॉर्कमध्ये फिलिपिन्सच्या एका अधिकार्‍यालाही संसर्ग झाला आहे. जे शहरातील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयातील या विषाणुचे पहिले प्रकरण आहे.

ऑस्ट्रेलियाच्या गृह विभागाचे मंत्री पीटर डटन यांनाही संसर्ग झाला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प आणि अमेरिकेचे अटॉर्नी जनरल विलियर बर्र यांची भेट घेतली होती. रोमानियामध्ये एका सीनेटरला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर देशाचे पंतप्रधान लुदोविक ओरबान यांनी त्यांना वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शेयर बाजार कोसळला
कोरोना व्हायरसमुळे अनिश्चिततेला तोंड देणार्‍या शेयर बाजारात शुकवारीसुद्धा चढ-उतार दिसून आला. आशियातील शेयर बाजारांमध्ये मोठी घसरण नोंदली गेली, परंतु नंतर तो थोडा सावरला. वॉल स्ट्रीटवर 1987 च्या ब्लॅक मंडे नंतरच्या सर्वात मोठ्या घसरणीने जपान, थाइलँड आणि भारताच्या शेयर बाजारात 10 टक्के घसरण नोंदली गेली आहे.