COVID-19 : ‘कोरोना’च्या रूग्ण संख्येत इटलीच्या पुढं गेला भारत, आता फक्त 4 देशात आपल्यापेक्षा जास्त ‘अ‍ॅक्टीव्ह’ केस

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोना व्हायरसचा प्रकोप सतत वाढत चालला आहे. बुधवारी देशात या व्हायरसने बाधितांची संख्या 1.11 लाखाच्या पुढे गेली होती. या कठीण काळात थोडी दिलासादायक बाब म्हणजे, यातील सुमारे 45 हजार कोरोना रूग्ण बरेसुद्धा झाले आहेत. जर देशातील अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्णांबाबत बोलायचे तर आपण इटलीच्या पुढे निघालो आहोत. आता जगात केवळ 4 देशच असे आहेत, जेथे कोविड-19 चे अ‍ॅक्टिव्ह रूग्ण भारतापेक्षा जास्त आहेत.

भारतात बुधवारी रात्री 11.30 वाजेपर्यंत कोविड-19 च्या एकुण केसेस 111,750 झाल्या होत्या. मागील एक आठवड्यात भारतात रोज सुमारे 5 हजारच्या जवळपास केस वाढत आहेत. भारतात कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केस 62,894 झाल्या आहेत. एक दिवसापूर्वी त्या 59 हजारच्या जवळ होत्या. भारताने मागील दोन दिवसात अ‍ॅक्टिव्ह केसच्या बाबतीत इटली आणि पेरू या देशांना मागे टाकले आहे. इटलीत 62,752 आणि पेरू त 60,045 केस आहेत.

इटलीत 32 हजार लोकांनी गमावला जीव

एकुण केसबाबत बोलायचे तर इटलीत 2.27 लाख आणि पेरूत 99,450 कोविड-19 चे रूग्ण आहेत. इटलीत या व्हायरसमुळे 32,330 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, येथे हा कहर कमी होत आहे. इटलीत आतापर्यंत 132,282 लोक कोविड-19 ला हरवून बरे झाले आहेत. पेरू मध्ये 2914 लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे 36 हजार रूग्ण बरे झाले आहेत. भारतात सुमारे 3,400 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.