Coronavirus : ‘चूक करू नका, दीर्घकाळासाठी सोबत राहील व्हायरस’, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर WHO चा ‘इशारा’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभरात सुरु असलेल्या कोरोना विषाणू कहरच्या दरम्यान डब्ल्यूएचओने एक नवीन चेतावणी जारी केली आहे. डब्ल्यूएचओने असा इशारा दिला आहे की कोरोना विषाणू बऱ्याच काळापर्यंत आपल्याबरोबर राहील. यापूर्वी, डब्ल्यूएचओने सांगितले होते की येणाऱ्या काळात कोरोना विषाणूचे गंभीर प्रकार दिसतील. परंतु डब्ल्यूएचओने कोरोना विषाणूच्या सतत बदलत्या प्रवृत्तीबद्दल हा नवीन इशारा दिला आहे.

व्हर्च्युअल प्रेस ब्रिफिंग दरम्यान डब्ल्यूएचओचे महासंचालक ट्रेड्रोस ए गेब्रेयेसस म्हणाले, ‘बर्‍याच देशांमध्ये साथीचा आजार सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि जेथून या साथीच्या आजाराची सुरुवात झाली होती तेथे याची प्रकरणे पुन्हा दिसून येऊ लागली आहेत. आपल्याला बराच काळ अजून या साथीला सामोरे जायचे आहे आणि आपल्याकडून साथीचा आजार पसरवण्यासाठी कुठल्या चुका होणार नाहीत याची खात्री करुन घ्यावी लागेल.’

डब्ल्यूएचओचा इशारा सरळ सरळ चीनच्या वुहान संदर्भात होता. वुहानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची नवीन प्रकरणे घटल्यानंतर लॉकडाउन हटवण्यात आले. परंतु वुहानमध्ये पुन्हा कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. दोन महिन्यांपूर्वी कोरोना संसर्गापासून बरे झालेल्या बर्‍याच रुग्णांमध्ये कोरोना पॉझिटिव्हची पुन्हा खात्री झाली आहे. अशा वेळी कोरोनाच्या बाबतीत जगातील ट्रेंड बदलताना दिसत आहे. लोकांमध्ये त्याची लक्षणे दिसत नाहीत, जे की संसर्ग पसरविण्यात खूप धोकादायक ठरू शकतात. डब्ल्यूएचओने याआधी चेतावणी दिली होती की जगात कोरोना विषाणूचा अजून वाईट काळ येईल. डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रोस यांनी कोरोना विषाणूची संसर्गाची तुलना 1918 च्या स्पॅनिश फ्लूशी केली होती, ज्यात 1 कोटीहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. टेड्रोसने लॉकडाउन हटविण्याच्या बाबतीत जगातील देशांना खबरदारी बाळगण्यास सांगितले आहे.

खरं तर, जगातील अनेक देश लॉकडाउन काढून टाकत आहेत. यावर डब्ल्यूएचओने चेतावणी दिली की ही घाई गंभीर परिणाम भोगण्याचे कारण बनू नये. डब्ल्यूएचओने जगातील सर्व देशांना लॉकडाउन हटविण्याची घाई करू नये, असे आवाहन केले होते. ते म्हणाले की कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जागरूक राहण्याची गरज असल्यामुळे सरकारांना सामाजिक अंतर आणि लॉकडाउन हळूहळू दूर करावे लागतील.

युरोपमधील बरेच देश लॉकडाउन हळू हळू काढण्याची तयारी करत आहेत. वास्तविक, यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे कोरोनामुळे जिथे प्रत्येक देशात हजारो लोकांचा मृत्यू होत आहे तर सोबतच त्याचा परिणाम लाखो करोडोच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. आतापर्यंत जगात कोरोना विषाणूचा 26 लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे तर 1 लाख 82 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.