दिवसभर उत्साहित राहण्यासाठी हे व्यायाम आवश्यक

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपल्या शरीरासाठी व्यायाम हा खूप अत्यावश्यक आहे. पण रोजच्या धावपळीच्या जीवनात किंवा आळसामुळे आपण व्यायाम करणे कटाक्षाने टाळतो. रोज व्यायाम करणारा व्यक्ती हा शरीराने अतिशय सुदृढ असतो. त्याला कोणत्याही आजाराने ग्रासलेल नसत. आणि दुपारनंतर जरी त्याच्याकडं पाहिलं तरी त्याचा चेहरा अतिशय टवटवीत आणि उत्साहित दिसतो. त्यामुळे दिवसभर उत्साहित राहण्यासाठी आपण थोड्या प्रमाणात तरी व्यायाम करणे आवश्यक आहे.

aerobics

खालील व्यायाम केल्याने तुम्ही उत्साहित राहाल
१) सायलिंग : आपण सकाळी उठल्या उठल्या जर सायकलिंगला गेले. तर त्यामुळे आपल्याला बाहेरील शुद्ध हवा मिळते. आणि सायकलिंगमुळे आपले सर्व स्नायू मोकळे होतात. त्यामुळं शरीराला आराम मिळतो. आणि आपण दिवसभर उत्साहित राहतो.

२) एरोबिक व्यायाम : ही एक शारीरिक क्रियाकलाप आहे आणि हे करताना शरीर रक्त पंप करते. आणि अनेक स्नायू गट एकत्रितपणे कार्य करतात. एरोबिक ऑक्सिजनची उपस्थिती आहे. म्हणूनच तिला हृदयाच्या रक्तवाहिन्या देखील म्हणतात. हा व्यायाम करणे शरीरासाठी आणि मनाच्या संतुलनासाठी अतिशय उपयुक्त आहे .

३) सूर्य नमस्कार : सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. यामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतोच. परंतु आत्मिक, मानसिक, व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते. हा व्यायम अल्पमोली आणि बहुगुणी आहे असे म्हणतात. त्यामुळे या व्यायाम केल्याने आपण दिवसभर उत्साहित राहतो.

४) मनाचा व्यायाम : ध्यानामुळे मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आराम जितका जास्त गहन, तुमचे काम तितकेच जास्त गतिशील. हा व्यायाम केल्याने मन शांत होते. तसेच या व्यायामामुळे केणत्याही ताणतणावाला आपल्या मनात ठार मिळत नाही. त्यामुळे आपण दिवसभर उत्साहित राहतो.

फेसबुक पेज लाईक करा