‘दाढी’ आणि ‘पगडी’मुळं शीख युवकाला हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला, ‘इंस्टा’ पोस्ट ‘व्हायरल’ झाल्यानंतर मालकाकडून ‘माफी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजतागायत विदेशातील अनेक रेस्टॉरंट तसेच क्लबमध्ये शीख समुदायांच्या लोकांना प्रवेश करण्यापासून रोखले गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु , देशाची राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा अशीच एक घटना समोर आली आहे. नुकताच दिल्लीतील एका रेस्टॉरंट मध्ये फॅशन डिझायनरला प्रवेश करण्यापासून रोखले गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

दिल्लीतील रेस्टॉरंट मध्ये प्रवेश करण्यापासून रोखले गेलेल्या तरुणाचे नाव परम साहिब असे आहे. परम साहिब यांनी परिधान केलेला पोशाखच त्याना रेस्टॉरंट मध्ये प्रवेश न देण्याचे कारण असल्याचे रेस्टॉरंटच्या मॅनेजर ने सांगिलते होते. दिल्लीत घडलेल्या या घटनेनंतर परम यांनी ही माहिती आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केल्यानंतर ही बातमी सगळीकडे व्हायरल झाली. यानंतर रेस्टॉरंट च्या मालकाचे डोळे उघडले त्यांनी सदरील व्यक्तीची माफी मागितली तसेच रेस्टॉरंट च्या मॅनेजरला नौकरीवरून काढून टाकण्यात आले.

मी सरदार असल्यामुळे मला प्रवेश करण्यापासून रोखले
इंस्टाग्राम वर आपल्या अकाउंटवरून हि माहिती शेअर करताना परम यांनी असे सांगिलते की, शनिवारी मला आणि माझ्या काही मित्रांना रेस्टॉरंट मध्ये प्रवेश करण्यापासून रोखले गेले कारण की, मी सरदार आहे. त्याचे कारण म्हणजे माझी दाढी, पिंक पगडी आणि शर्टवर रेस्टॉरंट च्या मॅनेजरला आक्षेप होता. या दरम्यान काउंटर वर बसलेल्या एका व्यक्तीने त्याच्या मैत्रिणीसोबत चुकीचा व्यवहार केला. तसेच काउंटरवर बसलेल्या एक व्यक्तीने असे म्हटले की, आम्ही शीख लोकांना लाउंज मध्ये प्रवेश देत नाही. हा आमचा मोटो आहे. असेही त्याने सांगितले. त्यानंतर त्याने असेही सांगितले की, परम ची पिंक शर्ट त्याला आवडत नाही.

रेस्टॉरंट मालकाने चूक कबुल केली, मॅनेजरला नौकरी वरून काढले
मंगळवारी परम यांनी पुन्हा एकदा पोस्ट टाकून सांगिलते की, रेस्टॉरंट च्या मालकाने आपली चूक कबूल केली आहे. तसेच क्लब मॅनेजर रवीला नौकरी वरून काढून टाकले आहे. यासोबतच परमने रेस्टॉरंट चा माफीनामा सुद्धा पोस्ट केला आहे. परम ने सांगिलते की, आम्ही माफी स्वीकार केली आहे. सोबतच रेस्टॉरंट च्या मालकासमोर अशी शर्त ठेवली ज्यात १०० गरीब लोकांना लँगर खाऊ घालण्याचे मान्य केले होते. असे परम यांनी पोस्ट मध्ये सांगितले आहे.

आरोग्यनामा ऑनलाइन –

You might also like