Coronavirus Impact : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर पुण्यातील हॉटेल्स, बार आगामी 3 दिवस बंद ! बैठकीत एकमताने निर्णय

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन  : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील हॉटेल्स आणि बार पुढील तीन दिवस बंद (20 मार्च) राहणार आहेत. हॉटेल संघटना आणि पुणे पोलिसात आज बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. शासनाने खबरदारी म्हणून मॉल, शाळा, महाविद्यालये तर बंद केली आहेतच, पण काही ठिकाणी कलम 144 लागू करत एकत्र न जमण्याचे आव्हान केले आहे. तसेच राजकीय, खासगी कार्यक्रम देखील स्थगित करण्यात आले आहेत.

दरम्यान, शहरातील बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी व्यापारी संघटनेने घेतला. तर प्रसिद्ध अशी तुळशीबाग देखील बंद आहे. यानंतर पुणे पोलीस आणि शहर हॉटेल्स अँड बार असोसिएशनची बैठक नुकतीच पोलीस आयुक्तालयात पार पडली. यावेळी खबरदारी म्हणून उद्यापासून पुढील तीन दिवस (दि. 20 मार्च) हॉटेल्स व बार बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे, अशी माहिती पुणे हॉटेल अँड बार असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले.