मुर्तींना स्पर्श करण्यास मनाई, सामुहिक नृत्यावर बंदी, सणासुदीसाठी सरकारची गाईडलाइन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात खबरदारीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार कंटेनमेंट झोनमध्ये उत्सवाचे आयोजन केले जाणार नाही. याव्यतिरिक्त पूजा, मेळावे, रॅली, प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठीही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.जाणून घेऊ या सरकारने कोणती मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत ते …

नियमांनुसार पाळले जातील कार्यक्रम
नवरात्र लवकरच सुरू होणार आहे आणि यावेळी देशभरात शामियाना लावण्यात येत असतात..या व्यतिरिक्त अनेक मेळावे आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक कार्यक्रमांसाठी पूर्ण नियोजन करावे लागेल तसेच गर्दी व सामाजिक अंतरांची काळजी घ्यावी लागेल.

शारीरिक अंतरासाठी, जमिनीवर खुणा ठेवाव्या लागतील,याचे अंतर ६ फूट ठेवावे लागेल. कार्यक्रमाच्या व्यवस्थापकांनी सॅनिटायझर आणि थर्मल गनची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित केली पाहिजे. तसेच ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होईल तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असतील जेणेकरुन सामाजिक अंतराचे नियम पाळता येणे शक्य होईल.

कोरोना संबंधित नियम
धार्मिक कार्यक्रमांच्या दरम्यान शारीरिक अंतराची आणि मास्कची आवश्यकता अधिक महत्त्वपूर्ण होईल. याशिवाय अगोदर धार्मिक रॅलीमध्ये मार्ग नियोजनदेखील केले जाईल. मूर्ती विसर्जन जागा देखील पूर्व निर्धारित केली जाईल. यावेळी देखील लोकांची उपस्थिती अगदी कमी संख्येने ठेवली जाईल.

पूजा कशी होईल
धार्मिक ठिकाणी मूर्तींना स्पर्श करण्यास मनाई आहे. कोरोना संक्रमणासंदर्भात, सामूहिक धार्मिक गाणे व वादन करण्याचे कार्यक्रम प्रतिबंधित केले जातील. त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेले धार्मिक संगीत वाजविले जाऊ शकते. सामुदायिक स्वयंपाकघर, लंगरमध्ये सामाजिक स्वयंपाकघरांचे नियम पाळणे आवश्यक आहे. तसेच सामुदायीक स्वयंपाकघरात स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी लागणार.

या व्यतिरिक्त कार्यक्रमाच्या जागेच्या स्वच्छतेपासून ते शूज आणि चप्पल काढण्यापर्यंत सांगितले गेले आहे. सणांच्या हंगामात कोरोनाच्या नियमांचे पालन करणे सर्वात महत्वाचे आहे कारण लोक कार्यक्रमांच्या वेळी एकत्र जमतात हे सूचनांमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे.