Restrictions in Maharashtra | राज्यात आणखी कठोर निर्बंध लागू होणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Restrictions in Maharashtra | राज्यात कोरोना (Coronavirus) आणि कोरोनाच्या नव्या ओमिक्रोन व्हेरिएंटचे (Omicron Covid Variant) रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात काही निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. राज्यापैकी मुंबई आणि पुण्यात रूग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर मुंबई (Mumbai), पुण्यासह (Pune) पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpri Chinchwad) कोरोना आणि ओमिक्रोनचे रूग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या निर्बंधाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. दरम्यान राज्यात आणखी कठोर निर्बंध (Restrictions in Maharashtra) लागू होणार का ? असा सवाल केला असता अजित पवार यांनी निर्बंधाबाबत मोठंं विधान केलं आहे.

 

राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच हाॅटेल, रेस्टाॅरंटमध्ये 50 टक्के उपस्थितीही बंधणकारक करण्यात आली आहे. दरम्यान दैनंदिन बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळे याहीपेक्षा राज्यात कडक निर्बंध लागणार का ? याबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांना सवाल करण्यात आला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, ”राज्याच्या संदर्भातील निर्णय हे राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री घेतात. त्याची नियमावली मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकजण घरच्या घरीच राहून उपचार घेताहेत. त्याबाबत केंद्र आणि राज्याचं आरोग्य विभाग सातत्याने माहिती देखील घेत आहेत. हे सर्व सुरू असताना जर उद्या ऑक्सिजन बेड्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि 700 मेट्रिक टनहून जादा ऑक्सिजनची मागणी राज्यात आली तर मग त्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदय कठोर निर्बंध घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.” (Restrictions in Maharashtra)

 

”राज्याच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेत्रृत्वाखाली अतिशय उत्तम पद्धतीने सुरू आहे.
आम्ही सर्वजण त्यांच्या टीमचे सहकार्य या नात्याने काम करत आहोत.
अधिकारीही काम करत आहेत. टास्क फोर्सही सातत्याने लक्ष देऊन आहे.
मुख्यमंत्री तर दररोज कोरोनाच्या स्थिती संदर्भातला आढावा घेत आहेत. असं अजित पवार म्हणाले.

 

Web Title : Restrictions in Maharashtra | coronavirus spike continues in maharashtra will Maharashtra government impose strict restrictions deputy chief minister ajit pawar gives reaction

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा