Restrictions in Maharashtra | राज्यातील निर्बंधाबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा; चित्रपटगृहे, मॉल्सवरही निर्बंध? शाळाही होणार बंद?, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Restrictions in Maharashtra | कोरोना (Coronavirus) आणि कोरोनाच्या ओमिक्राॅन व्हेरिएंटने (Omicron variant) महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची झोप उडाली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून (Maharashtra Government) आज (31 डिसेंबर) मध्यरात्रीपासून निर्बंध (Restrictions in Maharashtra) लागू करण्यात आले आहे. नव्या नियमावलीनूसार कार्यक्रमांसाठी एकत्र येण्यास 50 संख्येची मर्यादा घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री, टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली होती. यावेळी अनेक गोष्टीवर निर्बंध लावण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

 

काल (गुरूवारी) झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये शाळा, कॉलेज, मॉल्स, चित्रपटगृह यांच्यावरील संभाव्य निर्बंधांवरही चर्चा करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास लॉकडाऊनबाबत (Lockdown) देखील चर्चा करण्यात आली आहे. तसेच, सध्या तरी गर्दी कमी करण्यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी करोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यावर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आला. हे सर्व निर्बंध आज (शुक्रवारी) मध्यरात्रीपासून अमलात येतील. (Restrictions in Maharashtra)

 

या बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती (Debashish Chakraborty), मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे (Sitaram Kunte), पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (CP Hemant Nagarale), पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal), कोरोना कृती दलाचे डॉ. संजय ओक (Dr. Sanjay Oak), डॉ. शशांक जोशी (Dr. Shashank Joshi), डॉ. अजित देसाई (Dr. Ajit Desai), डॉ. राहुल पंडित (Dr. Rahul Pandit) आदी उपस्थित होते.

आजपासून निर्बंध काय असतील?

– खुल्या मैदान अथवा बंदिस्त सभागृहातील विवाह सोहळय़ांमध्ये केवळ 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी असेल.

– सर्वच राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत फक्त 50 लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी असेल. ही संख्या खुल्या किंवा बंदिस्त सभागृहांमधील कार्यक्रमांना लागू असेल.

– अंतिम विधीसाठी स्मशानभूमीत फक्त 20 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे.

– चौपाट्या, पर्यटन क्षेत्रे येथे गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, आवश्यकता भासल्यास स्थानिक प्रशासनाने चौपाट्या, समुद्रकिनारे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

शाळेबाबत चर्चा काय?
राज्यात काही दिवसांपूर्वी साधारण दोन वर्षानंतर शाळा (Maharashtra School) सुरु झाल्या आहेत. पण, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा धोका या पार्श्वभूमीवर शाळा पुन्हा बंद कराव्यात का? यावरही चर्चा करण्यात आली आहे. परंतु, आत्ता लगेचच शाळा बंद करू नयेत असं देखील बैठकीत बोलंलं जात असल्याची माहिती आहे.

 

महाराष्ट्रात ‘Lockdown’ लागणार?
मागील काही दिवसांपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लागू होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
पण त्याविषयी अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
कोरोनाची लाट रोखण्यासाठी अधिक कडक निर्बंध किंवा प्रसंगी लॉकडाऊनचे अधिकार स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहेत.
पण, लॉकडाऊन करताना शहर किंवा जिल्ह्यातील उपलब्ध खाटा आणि ऑक्सिजनची गरज याचा विचार करून निर्णय घेतला जाईल,
अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय.

 

 

Web Title :- Restrictions in Maharashtra | new rules in maharashtra amid corona cases rise in omicon restrictions 31st dec 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

WhatsApp Messages | व्हॉट्सअ‍ॅपवरुन विनाग्रुप 250 लोकांना पाठवू शकता नववर्षाच्या शुभेच्छा; जाणून घ्या सोपा मार्ग

 

Devendra Fadnavis | ‘मतदारांनी सारं काही झुगारुन लोकशाही निवडली’, सिंधुदुर्ग जिल्हा बँक विजयावर फडणवीसांचे मोजकं, पण सूचक विधान

 

Maharashtra Lockdown Again | महाराष्ट्रात पुन्हा लागणार का लॉकडाऊन?, आरोग्य मंत्र्यांनी केले मोठे वक्तव्य