Restrictions in Pune | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नवे निर्बंध? अजित पवारांची तातडीची बैठक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Restrictions in Pune | मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) अधिक वाढताना दिसत आहे. त्यातच मुंबईसह पुण्यातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पुण्यासह राज्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर काही निर्बंध देखील लागू केले आहेत. तर, पुणे शहरात (Pune News) दैनंदिन बाधितांची संख्या जास्त आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (शनिवारी) आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीत आता पुण्यात काही निर्बंध (Restrictions in Pune) लागतात का हे पाहावे लागेल.

 

गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांचा (Coronavirus)आकडा वाढताना दिसत आहे. दरम्यान याआधी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात काही प्रमाणात निर्बंध (Pune Night Curfew) लावले आहेत. मात्र तरीही पुण्यात रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आज आढावा बैठक बोलावली आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. दरम्यान या बैठकीत आता अजित पवार काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (Restrictions in Pune)

 

दरम्यान, मुंबई पाठोपाठ पुण्यातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) ओमिक्रॉनच्या रुग्ण दुपटीचा वेगही वाढला आहे. पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणखी कडक करायचे की नाहीत, याबाबत संबंधित बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. कौन्सिल हॉल या ठिकाणी ही बैठक होणार आहे. या बैठकीत शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे समजते. तसेच पवार हे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन पुढचा निर्णय ठरवणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्यात आणखी नवे निर्बंध लागणार का ? या निर्णयाकडे सर्व पुणेकरांचे लक्ष आहे.

 

Web Title : Restrictions in Pune | ajit pawar holds review meeting on pune lockdown restrictions Today corona update of pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा