Restrictions In Pune | कोरोनाचे निर्बंध वाढणार का? पुण्यातील आढावा बैठकीनंतर अजित पवार म्हणाले… (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Restrictions In Pune | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात (Pune News) कोरोना आढावा बैठक पार पडली. यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना कोरोना निर्बंधाबाबत (Restrictions In Pune) महत्वाची माहिती दिली आहे. ”राज्याच्या कोरोना नियमावलीत कोणताही बदल करण्यात आला नाही. सर्व नियमांचे कडक पालन केले जाईल. कुणालाही यातून सुट मिळणार नसल्याचे,” अजित पवार यांनी सांगितले आहे.

 

त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ”कोरोना टेस्टींग किट (Corona Testing Kit) मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. ज्या मेडिकलमधून अशाप्रकारचे किट विकले जात आहेत तिथं त्या ग्राहकांचे रेकॉर्ड ठेवले जाईल. यामुळे नेमके किती जण कोरोना चाचणी (Corona Test) करत आहेत हे समजायला सोपे जाईल.”

पुढं बोलताना अजित पवार म्हणाले, ”जिल्ह्यात मागील आठवड्याच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) वाढला आहे. सहा टक्क्यांवर असलेला हा रेट 17 टक्क्यांवर गेला आहे. मृत्यू दर 1.6 टक्क्यांवर गेला आहे. विनामास्क फिरणाऱ्यांकडून 46 लाखांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने सर्वांनी मास्क वापरावा” असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. (Restrictions In Pune)

 

अजित पवार काय म्हणाले? (महत्त्वाचे मुद्दे)

कोरोनाची तीव्रता कमी करायची असेल तर सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

सध्या सर्व वयोगटातील लोकांना कोरोना होतो आहे. दिलासादायक म्हणजे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी

पुढल्या आठवड्यात कोरोना रुग्णांचा आढावा घेऊन नवीन नियमावलीबद्दल निर्णय घेतले जातील.

PMPML बसमध्ये प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन.

पुणे जिल्ह्यात इंटरनॅशनल विमानतळ (Pune Internation Airport) होणार आहे.

 

दुपारी एका ठिकाणी अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री ‘आदित्य ठाकरे’ (aditya thackeray) असं चुकून उल्लेख झाला होता. त्याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना विचारलं असता त्यांनी तो उल्लेख माघारी घेत असल्याचं सांगितलं. दरम्यान, विरोधकांनी त्याबाबत पोटामधील ओठांवर आलं असं म्हंटलं होतं.

 

Web Title : Restrictions In Pune | corona restrictions increase what did ajit pawar say review meeting pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा