Restrictions in Pune | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नवे निर्बंध लागणार? महापौर मोहोळ यांची उद्या अजित पवारांसोबत बैठक (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Restrictions in Pune | कोरोना (Corona Virus) आणि कोरोनाच्या नव्या ओमायक्राॅन व्हेरिएंटचे (Omicron Covid Variant) रूग्ण राज्यात आढळून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात निर्बंध (Restrictions in Pune) लावण्याविषयी चर्चा सुरू आहे. पुण्यातील निर्बंधाबाबत महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी महत्त्वपुर्ण माहिती दिली आहे. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

 

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘पुण्यातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून महानगरपालिका आणि राज्य शासनातर्फे रुग्णांच्या सोयीसाठी सर्व व्यवस्था केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मंगळवार (4 जानेवारी) रोजी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत बैठक होणार असून त्यानंतर नवी नियमावली (New Rules) जाहीर होण्याची शक्यता आहे. असे महापौर मोहोळ यांनी सांगितलं आहे. (Restrictions in Pune)

 

 

नेमकं महापौर काय म्हणाले? (महत्वाचे मुद्दे)

– मागील काही दिवसामध्ये पुण्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत याचा आढाव घेतला आहे.

– 27 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान कोरोना रुग्ण झपाट्याने वाढले आहेत.

– मागील 8 दिवसांत चौपाटीने कोरोना रुग्ण संख्या वाढलीय.

– जवळपास रोज 80 ते 85 टक्के दोन्ही डोस घेतलेले लोक कोरोना बाधित आहे.

– सौम्य लक्षण आहेत मात्र, दोन्ही डोस झालेल्या लोकांत कोरोना होतोय.

– पुण्यात 3 लाख लोक असे ज्यांनी फक्त 1 डोस घेतला. हे नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यांच्याशी संपर्क करतोय.

– 15 ते 18 वयोगटातील लसीकरण सुरू केलं आहे, आज (सोमवारी) दोन लाख मुलांना 78 हजार डोस देत आहे.

– 2500 कोरोना रुग्णापैकी 346 रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत बाकी नॉर्मल आहे.

– 4 हजार रॅमिडिसिव्हीर शिल्लक आहेत 1800 बेड 9500 लिटर पर मिनिटं ऑक्सिजन तयार होतो.

– ऑक्सिजन बेड (Oxygen Bed) आणि हॉस्पिटल (Hospital) संख्या वाढवू शकतो, भरारी पथक करून आता नियम आहेत ते कडक पाळण्याचा प्रयत्न काही ठिकाणी हलगर्जीपणा केला जात आहे तिकडे तपासणी केली जात नाही.

– हॉटेल, विमानतळ इतर गर्दी ठिकाणी नियम पाळले जावेत.

– शाळा ऑनलाईन करण्याबाबत निर्णय घेतला जावा पालकांची भूमिका.

 

Web Title :- Restrictions in Pune | mayor murlidhar mohol declared new lockdown restrictions in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा