नवरात्रोत्सवात पुणेकरांवर बंधने ? प्रशासनाने दिले ‘हे’ मोठे संकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – गणेशोत्सवामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याने शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे आता आगामी नवरात्रौउत्सव मध्ये लोकांनी बाहेर पडू नये म्हणून काही बंधने घालण्यात येणार आहे असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जर नागरिकानी या काळात काळजी नाही घेतली तर कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू शकतो. विभागीय आयुक्त सौरभ राव आणि पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून पत्रकार परिषदेत हे मुद्दे मांडण्यात आले.

विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले ‘गणेशोत्सवापर्यंत दररोज कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र,गणेशोत्सव झाल्यानंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे आगामी नवरात्रौ उत्सव काळात नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. नवरात्रौ उत्सवानंतर दसरा आणि दिवाळी हे सण पण येणार आहेत तेव्हा सुद्धा लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शहरासह जिल्ह्यात गेल्या सात दिवसांत दररोजच्या चाचण्यांच्या तुलनेत बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण ३० टक्क्यांवरून २४ टक्क्यांवर आले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या तुलनेत दररोज उपचारांनंतर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे’, असे सौरभ राव यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवानंतर रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. उत्सवाच्या काळात नागरिक घराबाहेर पडत असल्यामुळे हि संख्या वाढत आहे.

सध्या तरी कोरोना आटोक्यात आला आहे पण जर आगामी नवरात्रौ उत्सवात लोकांनी काळजी नाही घेतली तर तर कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे असे विक्रम कुमार यांनी सांगितले आहे. ‘शहरात गणेशोत्सवापासून १७ सप्टेंबरपर्यंत दररोज सरासरी १९०० कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते.तेच प्रमाण १८ ते २६ सप्टेंबर या कालावधीत सरासरी १७०० झाले आहे.आता सध्या रोज १४०० ते १५०० कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत.’तेव्हा खाटा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडे सरासरी ३०० दूरध्वनी येत होते. आता हेच प्रमाण कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे खाटा मिळण्यासाठी दररोज सुमारे १२५ दूरध्वनी येत आहेत,’ असे विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे.