सौदी अरेबिया सरकारचा मशिदीवरील भोंग्यासाठी नवा नियम, आवाज वाढवल्यास होणार कारवाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मशिदीवरील भोंग्यासंदर्भात सौदी अरेबिया Saudi Arabia सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भोंग्याचा वापर कमी करा असे निर्देश तेथिल सरकारने दिले आहेत. इस्लाम धर्मासंबधी खात्याचे मंत्री अब्दुललतीफ अल शेख यांनी हा आदेश जारी केला आहे. सौदी सरकारने ट्विटच्या माध्यमातून नव्या नियमांची माहिती जनतेला दिली आहे. नव्या नियमांनुसार भोंग्याचा वापर फक्त अजान आणि इकामतसाठीच करता येणार आहे. या निर्णायामुळे कट्टरपंथीय मुस्लीम संतप्त झाले आहेत. मोहम्मद बिन सलमान हे सौदी अरेबियाचे राजपूत्र असून त्यांनी त्याच्या देशाचा कट्टरवादी चेहरा बदलून उदारमतवादी चेहरा धारण करण्याचे धोरण हाती घेतले आहे. भोंग्याबाबतचा हा निर्णय त्याचाच एक भाग आहे.

सौदी Saudi Arabia सरकारने दिलेल्या आदेशात लाऊडस्पीकरचा आवाज हा त्याच्या क्षमतेच्या 1/3 इतकाच असावा असे म्हटले आहेत. जो कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. भोंग्याच्या आवाजामुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या होत्या. या आवाजाचा लहान मुले आणि ज्येष्ठांना अधिक त्रास होत असल्याचे तक्रारकर्त्यांनी म्हटले होते. बहुतांश नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काहीनी सोशल मिडियावर कॅफे आणि रेस्टारंटमधील आवाज कमी करा अशी मागणी करत हॅशटॅग मोहीम सुरु केली आहे. या निर्णयाला विरोध करणारे हे सौदी अरेबियाचे शत्रू असल्याचे अलब्दुल लतीफ म्हटले आहे.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत

 

दिलासादायक ! दिवसभरात देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त