दहावीच्या निकाल उद्या (दि.८) जाहीर होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या (दि.८) जाहीर होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रधान सचिव डॉ. अशोक भोसले यांनी आज (गुरुवार) पत्रकाद्वारे दिली आहे.

गेल्या दोन आठवड्यापासून दहाविच्या निकालाबाबत वेगवेगळ्या तारखा येत होत्या. मात्र आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेच निकालाची तारीख जाहिर केल्यामुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल दि. ८ रोजी ऑनलाईन जाहीर होणार आहे. मार्च २०१८ मध्ये दहावीच्या परिक्षा झाल्या होत्या. ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुस-याच दिवसापासून गुणपडताळणी व छाया प्रतीसाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यासाठी आवश्यकत्या अर्जाचा नमुना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. संकेत स्थळावरील अर्जाची प्रत काढून अर्ज भरता येणार आहे. गुण पडताळणीसाठी संकेत स्थळावरील गुणपत्रीकेच्या सर्टीफाईड कॉपीसह दि. १८ जुन पर्यंत विहीत शुल्क भरुन अर्ज करता येणार आहे.

कुठे पाहाल निकाल?

www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल.