सोन्यात गुंतवणूकीसाठी लोकांमध्ये जागरूकता वाढली, सर्वसामान्यांचीही ‘गुंतवणूक’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता वाढल्यामुळे आता किरकोळ गुंतवणूकदारही सोन्यात गुंतवणूक करत आहेत, ज्यांनी यापूर्वी कधीही सोने खरेदी केले नाही. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (WGC) म्हणण्यानुसार, यापूर्वी कधीही सोन्याची खरेदी न केलेल्या 29 टक्के किरकोळ गुंतवणूकदार आता सोन्यात गुंतवणूक करण्यास तयार आहेत. कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, फिन्टेकचा विस्तार, आर्थिक समावेशन कार्यक्रम आणि सुरक्षित गुंतवणूक मानणारे यामध्ये गुंतवणूक करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेमुळे, सोन्यातील गुंतवणूक हीच सध्या सुरक्षित गुंतवणूक आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने भारताच्या किरकोळ गुंतवणूकदारांचा अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार 52 टक्के गुंतवणूकदारांकडे आधीपासून सोने आहे. अहवालानुसार गेल्या एक वर्षात 48 टक्के गुंतवणूकदारांनी सोन्यात पहिल्यांदाच गुंतवणूक केली आहे.

WGC चे एमडी भारत सोमासुंदरम पीआर म्हणाले की, आर्थिक समावेशन कार्यक्रम, फिन्टेकचा विस्तार आणि लोकांमधील सेफ हेवन गुंतवणूकीसाठी जागरुकता वाढल्याने नवीन गुंतवणूकदार सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ करत आहेत. याचा परिणाम सोन्याच्या उद्योगावर होईल, कंपन्या आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांपर्य़ंत पोहचून आपला विस्तार वाढवत आहेत.