बुधगावमध्ये दुचाकीच्या धडकेत निवृत्त शिक्षिका ठार

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – मिरज तालुक्यातील बुधगाव येथे दुचाकीने दिलेल्या धडकेत निवृत्त शिक्षिका ठार झाल्या तर एक महिला गंभीर जखमी झाली. बालिका दशरथ कोळेकर (वय ६५, रा. कवलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात सतीबाई दत्तात्रय हाक्के (वय ६६) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीचालक पसार असून याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

बालिका कोळेकर सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. कवलापूरमध्ये कुटूंबासह त्या राहतात. त्या आणि सतीबाई हाक्के रोज सकाळी फिरण्यासाठी जातात. गुरुवारी नेहमीप्रमाणे साडेपाचच्या सुमारास त्या फिरायला गेल्या होत्या. बुधगावमधील गुंडूबुवा मंदिराजवळ त्या दोघी आल्या. त्यावेळी मागून येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. त्यात कोळेकर गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र,वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. हाक्के गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेनंतर दुचाकी चालक पसार झाला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like