दुर्देवी ! 5 दिवस घरात मृत पडून होते सेवानिवृत्त लष्कराचे कॅप्टन, मुलाला वाटलं झोपलेत

पोलीसनामा ऑनलाईन टीम : भारतीय सैन्यातून निवृत्त 72 वर्षीय कॅप्टन राम सिंह आपल्याच घरात 5 दिवसांपासून मृत अवस्थेत आढळले. असे नाही की, रामसिंग घरात एकटेच राहत होते. त्यांच्यासोबत त्यांचा मानसिक विकृत मुलगा प्रवीण देखील होता जो असा विचार करीत होता की, त्याचे वडील पाच दिवस झोपलेले आहेत. प्रवीण घराच्या छतावर काही कपडे जाळत होता, तेव्हा शेजारच्या एका महिलेने पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मात्र, पोलिसांनी वृद्धाचा कुजलेला मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

हे प्रकरण हरियाणामधील यमुना नगरातील पॉश एरिया हूडा सेक्टर 17 येथील आहे, येथे भारतीय सैन्यातून मानद कॅप्टन पदावरून निवृत्त 72 वर्षीय राम सिंह त्यांचा मुलगा प्रवीण कुमार सोबत राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, राम सिंह यांची पत्नी आणि एक मुलगी यापूर्वीच मरण पावली. सेवानिवृत्त कॅप्टन रामसिंग पाच दिवसांपूर्वी रात्री रजाई घेऊन झोपले, परंतु सकाळी उठले नाही. प्रवीण मानसिकदृष्ट्या आजारी आहे, त्यामुळे त्याला वाटले कि, आपले बाबा जेवण करण्यासाठी नक्कीच उठतील. यावेळी, तो आपल्या पित्याच्या मृत्यूशी बेफिकीर गेल्या पाच दिवसांपासून मृतदेहाबरोबर राहत होता.

गुरुवारी सकाळी प्रवीण घराच्या छतावर काही जुने कपडे जाळत असताना शेजारच्या महिलेने पोलिस कंट्रोल रूममध्ये याची माहिती दिली. पोलिस प्रवीणला कपडे जाळण्याबद्दल समजावून सांगतच होते की, अधिकाऱ्यांना खोलीतून दुर्गंध येऊ लागला. पोलिसांनी आत डोकावले असता त्यांना रजईत रामसिंग यांचा सडलेला मृतदेह सापडला. यावेळी जवळच उभा असलेला मानसिक विकृत प्रवीण म्हणाला की, त्याचे वडील अजूनही झोपलेले आहेत, त्यांना काय झालेय? ते ठीक होतील का ? पोलिस तपास अधिकारी राम कुमार यांनी सांगितले की, प्रवीण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. शेजार्‍यांच्या म्हणण्यानुसार रामसिंह कोणत्याही शेजारच्यांशी बोलत नव्हते. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचा तपास सुरू केला आहे. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.