गुंडाराज ! निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा घरात घुसून निर्घृण खून

अमेठी : वृत्तसंस्था – लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या घरात घुसून एका टोळक्याने निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील अमेठी येथे शनिवारी रात्री घडली आहे. कमरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला असून घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

अमनुल्लाह असे खून झालेल्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे नाव आहे. ते भारतीय लष्करात कॅप्टन म्हणून सेवेत होते. शनिवारी रात्री ते घरामध्ये बसले असताना अचानक एका टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. टोळक्याने त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. मारहाणीत अमनुल्लाह यांच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कमरोली पोलीस स्थानकाच्या हद्दीतील ‘गोडिया का पुरवा’ या गावात खळबळ उडाली आहे.

घटनेचा तपास करणारे सहायक पोलीस अधीक्षक दयाराम यांनी सांगितले की, आम्हाला अमनुल्लाह यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार घटनेच्यावेळी अमनुल्लाह आणि त्यांची पत्नी हे दोघेच घरामध्ये होते. अचानक काही लोकांचं टोळक घरात घुसलं आणि त्यांनी लाकडी दांडक्याने त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत अमनुल्लाह यांचा जागीच मृत्यू झाला.

आरोग्यविषयक वृत्त