निवृत्त सहाय्यक आयुक्त मधुकर मोटे यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   निवृत्त सहाय्यक आयुक्त मधुकर मोटे (वय 72) यांचे निधन झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.

पुण्यातील केईएम रुग्णालयात मधुकर मोटे यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना उपचार घेतल्यानंतर ते कोरोनामधून बाहेर देखील आले होते. मात्र त्याचे साईड ईफेक्ट झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज त्यांचा मृत्यू झाला. मोटे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील होते. 1976 साली ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात रुजू झाले. त्यानंतर ते पुणे ग्रामीण पोलीस दलातून उपअधिक्षक म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मित्र परिवार मोठा होता. त्यांनी पोलीस दलात अत्यंत उल्लेखनीय काम केले होते. त्यांच्या अचानक मृत्यूने शोककळा पसरली आहे.