अकोल्यात उपजिल्हाधिकार्‍यासह पत्नीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने प्रचंड खळबळ

अकोला : पोलीनामा ऑनलाइन –   उपजिल्हाधिकारी आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह त्यांच्या बंगल्यात जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बळवंत कॉलनीत घडली आहे. भगत दांपत्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना कशामुळे घडली आणि यामागे काय कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

नथुजी भगत आणि हेमलता भगत असे मृत दांपत्याचे नाव आहे. मृत नथुजी भगत हे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी असून त्यांची पत्नी हेमलता घरकाम करीत होत्या. अकोला शहरातील बळवंत कॉलनी परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. खदान पोलीस तपास करीत आहेत.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी भगत यांच्या बंगल्यात त्यांच्या पत्नीसह दुसरे कोणीही राहत नव्हते. घरात आग लागून जीव गुदमरल्यामुळे भगत दाम्पत्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, हा घात आहे की घातपात याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भगत यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे. सेवानिवृत्तीनंतर उपजिल्हाधिकारी भगत हे आपल्या पत्नीसह बंगल्यात राहत होते. त्यांच्याकडे फारसं कोणी येत जात नसल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like