ममता बॅनर्जीवर आरोप करत ‘त्या’ अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यामंत्र्यानी माझ्यावर सुड उगविण्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले असून त्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचा आरोप करत IPS अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गौरव दत्त IPS अधिकाऱ्याचे नाव आहे, ते १९८६ च्या बॅचचे अधिकारी होते.

या सनदी अधिकाऱ्याने हातची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. गौरव दत्त यांनी मागील वर्षी स्वेच्छनिवृत्ती घेतली होती. दत्त याच्यावर काही वर्षापुर्वी भ्रष्ट्राचाराचा आरोप झाला होता. त्या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली होती.

‘या प्रकरणात अद्याप पोलिसांकडे काही ठोस पुरावे नसल्याने पोलीस महासंचालकांनी ही केस बंद करण्याची शिफारस ममता बॅनर्जी यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी केस बंद करण्यास नकार दिला आहे. त्या सूडबुद्धीने हे सर्व करत आहेत. त्यांच्यापुढे झुकण्यापेक्षा मी मरण पसंत करतो.त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असे गौरव दत्त यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहले होते

Loading...
You might also like