रिटायर्ड IPS नागेश्वर राव यांच्या ट्विटवरून ‘गदारोळ’, Swami Agnivesh यांचा यापूर्वीच मृत्यू होण्याची व्यक्त केली इच्छा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीबीआयचे अंतरिम चीफ राहिलेले आणि रिटायर्ड आयएएस अधिकारी नागेश्वर राव यांनी स्वामी अग्निवेश यांच्यावर केलेल्या एका टिपण्णीने मोठा वाद उभा राहिला आहे. ट्विटवर त्यांनी केलेल्या या टिपण्णीवर लोक संतापाने त्यांच्यावर कठोर टिका करत आहेत.

राव यांनी ट्विटमध्ये स्वामी अग्निवेश यांना हिंदूविरोधी म्हटले असून ते अगोदरच का मेले नाही, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या ट्विटवर प्रचंड आक्रोश देशभरात दिसून येत आहे. आर्य समाजाचे प्रमुख नेते स्वामी अग्निवेश यांचे काल शुक्रवारी सायंकाळी 81 व्या वर्षी निधन झाले. ते सनातन धर्मावर टिका करत असल्याने नेहमी वादात असायचे. त्यांच्यावर हिंदू विरोधी असल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाणदेखील केली होती.

नागेश्वर राव यांच्या कोणत्या टिपण्णीवर भडकले लोक
माजी आयपीएस ऑफिसर आणि सीबीआयचे अंतरिम चीफ राहिलेले नागेश्वर राव यांनी स्वामी अग्निवेश यांच्याबाबत काय म्हटले ते जाणून घेवूयात…राव यांनी ट्विट केले की, खुप छान आहे, सुटका झाली. स्वामी अग्निवेश, तुम्ही भगव्या कपड्यात हिंदू विरोधी होतात. तुम्ही हिंदूत्वाचे मोठे नुकसान केले. मला लाज वाटते की, तुम्ही तेलुगु ब्राह्मण म्हणून जन्माला आले होतात. राव यांनी संस्कृतमध्ये लिहिले, गोमुख व्याग्रं. नंतर पुढे लिहिले, हरणाच्या कातडीमध्ये लांडगा. माझी यमराजाकडे तक्रार आहे की, त्यांनी इतका वेळ वाट का पाहिली!

राव यांच्या या ट्विटवर संतप्त कमेंटचा महापूर आला. अनेकांनी त्यांच्यावर आपला संताप व्यक्त केला. तर काहींनी त्यांना सीबीआयचे अंतरिम प्रमुख असताना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या चपराकीची आठवण करून दिली. काहींनी त्यांना द्वेष करणारे म्हटले.

https://twitter.com/MNageswarRaoIPS/status/1304458417096912896

संपूर्ण पोलीस दलाला काळीमा : आयपीएफ
पोलीस आणि सामान्य लोकांना एका व्यासपीठावर आणणार्‍या थिंक टँक इंडियन पोलीस असोसिएशनने राव यांचे ट्विट रिट्विट करत लिहिले, स्वाताला आयपीएस अधिकारी म्हणवणार्‍या एका रिटायर्ड अधिकार्‍याकडून असा द्वेषपूर्ण मॅसेज करण्यात आला आहे. त्यांनी पोलिसांच्या वर्दीवर डाग लावला आहे आणि सरकारला लाजिरवाणे कृत्य केले आहे. त्यांनी देशातील संपूर्ण पोलीस दलाला, खासकरून तरूण अधिकार्‍यांसमोर लज्जास्पद काम केले आहे.

टिकेनंतर सुद्धा राव यांची आडमुठी भूमिका
टिकेनंतर सुद्धा नागेश्वर आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी एका यूजरला सनातन धर्माच्या संदर्भाने उत्तर सुद्धा दिले. त्यांनी लिहिले, आपण राक्षस किंवा वाईट ताकदींच्या वधाचा दिवस सण म्हणून साजरे का करतो? कारण ते दुसर्‍यांना त्रास देणारे आणि समाजाचे नुकसान करणारे असतात. यासाठी त्यांचा मृत्यू उत्सवाचे निमित्त होते. यामध्ये लोकांसाठी हा देखील संदेश आहे की, चुकीच्या व्यक्तींना संरक्षण देऊनका. आश्चर्य म्हणजे काही धर्मांध लोक नागेश्वर राव यांचे समर्थन करताना दिसत होते, परंतु त्यांची संख्या अतिशय कमी होती.

https://twitter.com/GEORGE52107460/status/1304497303764443137