निवृत्त न्यायाधीशांच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या गळ्यातील ४० हजारांची सोन साखळी जबरदस्तीने हिसका मारुन तोडून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरेगाव पार्क येथील लेन ‘बी’ मध्ये ही घटना सकाळी पावणे नऊ वाजता घडली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4e988a19-caae-11e8-8457-5b4a7f18277e’]

याबाबात निवृत्त न्यायाधीश यांचा नोकर जाधव यानी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोन साखळी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त न्यायाधीश रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. ते परत घरी पावणे नऊ वाजता येत होते. त्यावेळी नार्थ मेन रोड लेन ‘बी’ येथून ते पायी जात होते. त्या दरम्यान गोवर्धन सोसायटी जवळ पाठीमागून दुचाकीवर आलेल्या सोन साखळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची सोन साखळी जबरदस्तीने हिसका मारुन तोडून नेली. निवृत्त न्यायाधीशांच्या गळ्यातील साखळी चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.

[amazon_link asins=’B00IP6C1AI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’75a83ca0-caae-11e8-92ec-8d39859975cd’]

गेल्या काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने साखळी चोर पकडले होते. त्यांच्याकडून वट सावित्री पौर्णिमा दिवशी घडलेले गुन्हे आणि इतर काही गुन्हे उघडकीस आले होते. त्या नंतर मात्र साखळी चोरीचे गुन्हे घडले नाहीत मात्र रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा साखळी चोर सक्रिय झालेत असे चित्र निर्माण झाले आहे. सध्या पोलीस पेट्रोलिंग वर भर देत आहेत. अलीकडील काळात साखळी चोरीचे प्रमाण नगण्य आहे. अधिक तपास कोरेगाव पार्क पोलिस करत आहेत.

पुणे / पानशेत : नदीत बुडालेल्या आईला वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या बहिण-भावाचा मृत्यू