Pune : मद्यधुंद अवस्थेत कार चालवून 5 जणांना उडविणार्‍या सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकास अटक, न्यायालयानं सुनावली कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   मद्यपानकरून कार चालवत पाच जणांना उडविल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संजय निकम यांनी चतुशृंगी पोलीसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी दुपारी हा भीषण अपघात बालेवाडी परिसरात झाला आहे.

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संजय वामनराव निकम (वय 58) असे पोलीस कोठडी मिळालेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेत संतोष बन्सी सिंग (वय 35, रा. काळेवाडी) यांचा मृत्यू झाला असून, राजेश सर्वेश सिंग, यशवंत भाऊसाहेब भांडवलकर (वय 29), दशरथ बबन माने (27), छोटू पंक्चरवाला आणि सलमान लाल तांबोळी (रा. पाण्याच्या टाकीजवळ बालेवाडी) हे जखमी झाले आहेत.

निवृत्त पोलिस अधिकारी संजय निकम यांनी मद्यपान केल्यानंतर स्वतः कार घेऊन जात असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटून कमिन्स कंपनीकडून ममता चौकात त्यांनी दुचाकीला उडविले. त्यानंतर ते एका पंक्चर दुकानात कार शिरुन तिने समोर उभा असणाऱ्या एका टेम्पोला उडविले. अपघात इतका भयंकर होता की टेम्पो पलटी झाला. तर अपघातात संतोष यांचा गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला. तर चौघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर नागरिकांनी निकम यांना चोप दिला. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली. चतुशृंगी पोलिसांनी निकम यांना अटक केली असून, आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास चतुशृंगी पोलीस करत आहेत.