निवृत्‍त वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कुंटणखान्यातून सुटका केलेल्या ३ अल्पवीयन मुलींना पुन्हा तेथेच पोहोचवल्याच्या आरोपाखाली नागपाडा पोलिस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक कलंदर शेख यांना शनिवारी अटक करण्यात आली होती. १५ वर्षापुर्वीचा हा प्रकार रेस्क्यू फाऊंडेशनने उघडकीस आणला होता. सदरील प्रकरणाचा पुन्हा तपास करावा असा आदेश सत्र न्यायालयाने 3 वर्षापुर्वी दिला होता.

रेस्क्यू फाऊंडेशनचे प्रमुख दिवंगत बाळकृष्ण आचार्य, अ‍ॅड. हरीश भंडारे यांना सन २००४ मध्ये पश्‍चिम बंगाल आणि नेपाळमधून ३ अल्पवयीन मुलींची कामाठीपुरा येथील एका कुंटणखान्यात विक्री झाल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी याबाबत त्यावेळचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कलंदर शेख यांना कळविले होते. फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आणि पोलिस पथकाने कुटणखान्यावर छापा टाकुन ३ अल्पवयीन मुलींची सुटका केली.

पोलिसांना सुटका करण्यात आलेल्या मुलींची रवानगी महिला सुधारगृहात करणे गरजेचे होते. मात्र, त्यावेळी तसे झालेले नाही. एकंदरीत प्रकरणाचा पुन्हा तपास केल्यानंतर शेख यांनी सुटका करण्यात आलेल्या मुलींना पुन्हा कुंटणखान्यात पोहोचवण्यास मदत केल्याचे समोर आले. त्यामुळे शेख यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली.

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like