उत्कापिंडाव्दारे 5 हजार कोटी मिळणार असल्याचं सांगून भामटयानं निवृत्त जवानाला दीड कोटींना गंडवलं

डेहराडून : वृत्तसंस्था – फसवणुकीच्या बर्‍याच प्रकारच्या घटना समोर येत असतात, ज्यामध्ये अनेक मार्गांनी लोकांची फसवणूक करतात. पण उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये एका विचित्र बाब समोर आली आहे, ज्यात एका निवृत्त सैनिकाकडून उल्कापासून लक्षाधीश बनवण्याबाबत कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. वास्तविक हे प्रकरण उत्तराखंडमधील डेहराडूनचे आहे, येथे एका सेवानिवृत्त सैनिकाची सुमारे दीड कोटींची फसवणूक केली आहे. त्यांनी सांगितले की, एका कंपनीकडून एक व्यक्ती २०१७ मध्ये भेटला, त्याने सांगितले की जम्मू आणि हिमाचलमध्ये काम करणाऱ्या त्याच्या एका क्लायंटकडे उल्कापिंड आहे.

त्याने सांगितले की, याची बाजारात किंमत ५ हजार कोटी आहे, ज्याला तो १० कोटीला विकेल. त्यासोबतच त्याच्या वैज्ञानिक चाचणीसाठी सुमारे १० लाख रुपये लागतील असेही सांगण्यात आले. काही काळ विचारपूस केल्यानंतर सैनिकाने त्या कंपनीला जवळपास दीड कोटी रूपये वेगवेगळ्या प्रकारे दिले. पण नंतर जेव्हा हे फसवणूकीचे प्रकरण असल्याचे उघडकीस आले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

डेहराडूनचे डीआयजी अरुण मोहन जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्कापिंडाच्या नावाखाली फसवणूकी प्रकरणी पोलिसांना ९ पानांची तक्रार मिळाली आहे. त्यात लिहिले गेले आहे की, उल्कापिंडाच्या नावाखाली ठगांनी त्यांना ५ हजार कोटींचा मालक बनवण्याचे स्वप्न दाखवले, यामुळे पीडित व्यक्तीने वेगवेगळ्या वेळी दीड कोटी रुपये दिले आहेत. पण ना उल्कापिंड मिळाले ना पैसे परत आले. पोलिसांना तक्रारीत पीडिताने हेही सांगितले की, आरोपीने त्यांना धर्मशाळा येथून सापडलेले उल्कापिंड १० इंच असल्याचे सांगितले. लंडनच्या बाजारात ते प्रति इंच ५०० कोटी रुपये दराने विकले जाते. ज्याची किंमत त्यांनी ५ हजार कोटी निश्चित केली आहे.

उल्कापिंडच्या कल्पनेत सर्व आरोपींनी पीडित सैनिकाला धर्मशाला, दिल्ली आणि काश्मीरपर्यंत फेऱ्या मारायला लावल्या. तसेच जादुई उल्कापिंड दाखवण्याच्या आणि तपासणीच्या नावाखाली संपूर्ण बनावट नाटक तयार केले. इतकेच नाही तर आरोपीने कंपनी मालक आणि बॉलिवूडच्या एका गायक आणि मोठ्या संगीतकाराचे नाव घेऊन बनावट नाटक तयार केले. अशात पीडित सैनिक सहजपणे जाळ्यात सापडला. यानंतर पीडित सैनिकाने दीड कोटींपेक्षा जास्त रक्कम वेगवेगळ्या खात्यात जमा केली. मागील ३ वर्षांपासून सैनिकाला ना कुठलाही उल्कापिंड मिळाला आणि ना कोणतीही जादुई सामग्री दिसली. त्यानंतर त्याला फसवणूकीची जाणीव झाली आणि त्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. सध्या पोलिसांनी सलीम नावाच्या व्यक्तीसह अर्ध्या डझनहून अधिक जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर तपास सुरू केला असून आरोपींच्या नेटवर्कची तपासणी करत आहेत.