माजगावमधील अपघातात सेवानिवृत्त उपप्राचार्यांसह त्यांची मुलगी व चालक ठार !

माजलगाव : पोलीसनामा ऑनलाईन – कार आणि ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात सेवानिवृत्त उपप्राचार्य त्यांची मुलगी आणि चालक यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नॅशनल हायवे 61 कल्याण-विशाखापट्टणमवरील गंगामसलाजवळ हा अपघात झाला. मंगळवारी मध्यरात्री अंदाजे पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चालक विजय सेवानिवृत्त उपप्राचार्य विनायक दत्तात्रय जावळे ( 58, रा. शिवाजी नगर परभणी ), रूपाली विनायक जावळे ( 24, रा. शिवाजीनगर, परभणी ) व ज्ञानेश्वर कानडे (24, रा. पिंपळगांव ता. जिंतूर ) अशी मृत तिघांची नावे आहेत.

परभणी येथील शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य विनायक दत्तात्रय जावळे आपली मुलगी रूपालीसह स्विफ्ट कारने (क्र.एम.एच.14,जियु.2731) परभणीकडे जात होते. विजय ज्ञानेश्वर कानडे हा कार चालवत होता. यावेळी त्यांची कार आणि पुण्याकडे जाणाऱ्या जिजाऊ ट्रॅव्हल्स (क्र. एम. एच. 22 एफ. 8899) यांच्यात गंगामसला जवळ समोरासमोर धडक झाली.

या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत विनायक जावळे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी माजलगाव ग्रामीण पोलिसांना फोन करत याबाबत माहिती दिली. कार चालक विजय आणि जावळेंची कन्या जागीच मरण पावले. परंतु जावळेंचा श्वास सुरु होता. पोलिसांनी त्यांना बीड रुग्णलयात दाखल केलं होतं. जावळेंच्या डोक्याल गंभीर मार लागला होता. त्यांचा मेंदू बाहेर पडला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जावळेंच्या गाडीत एक पेढ्याचा बॉक्सही होता जो रक्तानं माखलेला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/