निवृत्त जवानाने मुलीला आणि पत्नीला दिले जिवंत पेटवून; स्वतः केली रेल्वे खाली उडी घेऊ आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन

अमळनेर येथे एका निवृत्त जवानाने आपल्या पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असून स्वतः रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या दुर्दैवी घटनेत पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे.अनिल खैरनार अस पतीच नाव आहे तर सरिता खैरनार पत्नीचं नाव असून घटनेत मयत झालेल्या मुलीचं तनुजा अस नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,अमळनेर परिसरात आज पहाटे साडेचार वाजता अचानक निवृत्त जवान अनिल खैरनार याने साखर झोपेत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले त्यानंतर पेट्रोल टाकून पेटवून दिले परंतु पाच वर्षीय मुलाला जाग आली आणि तिने आईला जाऊन घट्ट पकडलं.यात आई आणि मुलगी गंभीर भाजली आहे,तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले परंतु मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.तर आई सरिता खैरनार या गंभीर जखमी झाला आहेत.या दुर्दैवी घटनेत जखमी महिलेच्या पतीचा आणि मुलीचा मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.