Retirement च्या नंतरसुद्धा EPF खात्यावर मिळू शकते व्याज ! ते सुद्धा विना कॉन्ट्रीब्यूशन, जाणून घ्या कधी आणि कसे?
नवी दिल्ली : रिटायर्मेंट (Retirement) नंतर सरकारी कर्मचार्यांना एक ठराविक पेन्शन मिळते. यातून वृद्धपकाळातील खर्च सहजपणे भागवता येतो. नोकरीच्या दरम्यान ईपीएफ खात्यात सॅलरीतील काही भाग जमा होत असतो. या भागावर व्याज मिळते आणि नंतर हेच पैसे पेन्शनच्या रूपात मिळतात. परंतु, तुम्हाला हे माहित आहे का की, रिटायर्मेंटच्या (Retirement) नंतरसुद्धा पीएफवर व्याज मिळू शकते. हे कधी आणि कसे मिळते ते जाणून घेवूयात…
कधी आणि कुणाला मिळेल लाभ
ईपीएफ खाते (epf account) कर्मचार्याला 58 वर्षाच्या वयापर्यंत पेन्शनवर (Pension) व्याज (Interest) देते. जर कुणी 55 वर्षाच्या वयात रिटायर्ड झाले किंवा नोकरी सोडली तर ठरलेल्या कालावधीपर्यंत व्याज मिळू शकते. अशावेळी कॉन्ट्रीब्यूशन नसले तरी लाभ मिळतो.
केव्हा मिळणार नाही व्याज
नियमानुसार, जर तुम्ही 3 वर्ष म्हणजे 36 महिन्यांच्या आत पीएफमधून पैसे काढले नाही तर ईपीएफ अकाऊंट आपोआप निष्क्रिय होते. अशावेळी व्याज मिळत नाही.
कधी करू शकता अर्ज
जर कुणी सदस्य कायमस्वरूपी परदेशात गेला किंवा त्याचा मृत्यू झाला, अशा स्थितीत जर नॉमिनीने 36 महिन्यांच्या आत पैशांवर क्लेम केला नाही तर उर्वरित जमा रक्कम काढण्यासाठी अर्ज करता येणार नाही.
SCWF मध्ये जाईल रक्कम
इनअॅक्टिव्ह पीएफ अकाऊंट 7 वर्षापर्यंत इनअॅक्टिव्ह मानले जाते. जर तुमच्या खात्यातून फंडसाठी
क्लेम केला गेला नाही तर रक्कम सिनियर सिटीजन्स वेलफेयर फंड (SCWF) मध्ये जाते. पीएफ
अकाऊंटची ट्रान्सफर झालेली विना क्लेमची रक्कम 25 वर्षापर्यंत सिनियर सिटीजन्स वेलफेयर
फंडमध्ये राहते. या दरम्यान पीएफ अकाऊंट होल्डर (PF account holder) रक्कमेवर दावा करू
शकतात.
Pune Crime News | कुख्यात तडीपार गुंड पप्पू वाडेकरचा खून, पुणे जिल्ह्यात खळबळ