परतीचा मान्सून 48 तासात राज्यात दाखल होणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातील हवामान बदलाचा ( climate change) फटका मान्सूला बसला होता. परिणामी परतीचा मान्सून (return-monsoon ) पुढे ढकलला नव्हता. मात्र मंगळवारी हवामानात झालेल्या बदलानंतर आता येत्या 48 तासात परतीचा मान्सून उत्तर महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. सध्या परतीचा पाऊस मान्सून गुजरात मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश असून त्याचा प्रवास उत्तरोत्तर पुढे सरकणार आहे.

गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ आदी ठिकाणी तुरळख पावसाची नोंद झाली असून 21 ऑक्टोंबर रोजी दक्षिण कोकण, गोवा, मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, मेघगर्जना आणि विजेच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबईत देखील पावसाने ब-यापैकी विश्रांती घेतली असून बुधवारी आणि गुरुवारी आकाश सामान्यतः ढगाळ राहिल. मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like