धारवाड जवळ ट्रीपला निघालेल्या बसचा भीषण अपघात,मृत्यूची संख्या वाढून झाली 11

धारवाड : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकातील धारवाड शहरातील इट्टीगट्टीजवळ शुक्रवारी सकाळी मिनीबस आणि ट्रकची टक्कर झाल्याने हा भीषण अपघात झाला. त्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये अधिक महिला प्रवासी आहेत. ट्रीपला जाणारे मुले हे सेंट पॉलच्या शाळेचे विद्यार्थी होते. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

जखमी प्रवाशांना तातडीने धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातातील घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहेत. त्यांनी PMO च्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करण्यात आलं आहे. धारवाडमधील अपघातात झालेल्या तसेच अपघातातील जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

अपघात नेमका कसा झाला याबाबतही माहिती घेतली जात आहे. पोलीस अधीक्षक कृष्णकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातप्रकरणी पोलिसांनी धारवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. तसेच या अपघातातील जखमींना केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.