Revati Supriya Sule | आई सुप्रिया सुळेंसाठी लेक ‘रेवती’ मैदानात, बारामतीमधील प्रचारफेरीत युगेंद्र पवारांसोबत सहभाग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Revati Supriya Sule | बारामती लोकसभेच्या (Baramati Lok Sabha) उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब (Pawar Family) निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. अजित पवारांचे सख्खे बंधू आणि पुतण्या युगेंद्र (Yugendra Pawar) , वहिनी हे सुद्धा सुप्रिया सुळेंच्या प्रचारात उतरले आहेत. सुनेत्रा पवारांसाठी पार्थ आणि जय ही दोन्ही मुले प्रचारासाठी बाहेर पडली असताना आता सुप्रिया सुळेंची लेक रेवती सुळे सुद्धा प्रचारात सहभागी झाली आहे.

अजित पवार (Ajit Pawar), सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि त्यांची दोन मुले वगळता सुप्रिया यांना संपूर्ण पवार कुटुंबाने पूर्ण पाठिंबा दिला आहे. आज बारामतीमध्ये काढण्यात आलेल्या प्रचारफेरीत सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे सहभागी झाली होती. अद्याप सुप्रिया सुळे यांचे पती मात्र या राजकारणात उतरलेले दिसत नाहीत.

आज रेवती सुळे हिने प्रचारफेरीत सहभाग घेतल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार म्हणाले, सुप्रिया सुळे यांना लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. सगळे बाहेर पडले आनंद आहे.
या निवडणुकीत पहिल्यांदा रेवती फिरत आहे. आमचे विचार वेगळे असू शकतात पण आमच्यात भांडण नाही.
पदाधिकारी आणि पुढारी नसले तरी सर्वसामान्य जनता आमच्यासोबत आहे.
लवकरच सुप्रिया सुळेंचा मुलगा विजय सुळे देखील प्रचारात सहभागी होणार आहे.

अजित पवार यांनी आमदारीची स्वप्ने पडत असल्याची टीका युगेंद्र यांच्यावर केली होती.
याबाबत युगेंद्र पवार म्हणाले, मला आमदारकीची स्वप्नं पडत नाहीत माझ्या मनात देखील आले नाही.सध्या मी प्रचार करत आहे.

अजून मी आमदारकीचा विचार केला नाही. याचा गंभीरपणे विचार केला नाही.
विचार करेन आणि घरातील सगळ्यांशी चर्चा करुन निर्णय घेईन. दादा सहज बोलून गेले. दादांची सगळीच वक्तव्य गांभिर्याने घ्यायची नसतात, असे युगेंद्र पवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांनी दिला मतदारांना शब्द, म्हणाले – ”पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह फेडणार”

ACB Trap On Police Inspector | लाच घेताना पोलीस निरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, संतप्त जमावाची पोलीस गाडीवर दगडफेक

Amol Kolhe On Eknath Shinde | भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी ! मुख्यमंत्र्यांना शिरुर मधून द्यायची होती, छगन भुजबळांना उमेदवारी; डॉ.अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट (Video)