खुलासा : चीनच्या विस्तारवादी मोहिमेचा भाग होती गलवान खोर्‍यातील ‘हिंसक’ हाणामारी

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – लडाखच्या गलवान खोर्‍यात पेट्रोलिंग पॉईंट 14 वर झालेल्या हिंसक युद्धसदृष्य हाणामारीत 20 भारतीय जवान शहीद होणे हे चीनने विचारपूर्वक आखलेले एक मोठे कटकारस्थान होते. हा चीनी सैनिकांना या क्षेत्रात तैनात करणे आणि दक्षिण आशियाई देशांच्या भागांवर दावा करण्याचा प्रयत्न होता, असा खुलासा यूएस न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्टला मिळालेल्या काही कागदपत्रांवरून करण्यात आला आहे.

यूएस न्यूजचे राष्ट्रीय सुरक्षा प्रतिनिधी पॉल डी. शिंकमॅन यांनी लडाखमधये लष्करामध्ये झालेल्या हिंसक हाणामारीवर भारत सरकारच्या विचारांबाबत माहिती देणार्‍या कागदपत्रांचा संदर्भ देत म्हटले आहे की, भारत लडाखमध्ये झालेल्या संघर्षाकडे चीनच्या साम्राज्यवादी विचारधारेशी जोडून पाहतो.

चीन सामान्यपणे विस्तारवादासाठी प्रत्यक्ष सैन्य कारवाई करत नाही, परंतु अनेकदा देशांचे सार्वभौमत्व आणि अर्थव्यवस्था भेदण्याची किंवा कमजोर करण्याची कुटनिती करतो. शिंकमॅन म्हणतात, कागदपत्र, काही विश्लेषकांची वक्तव्य आणि शोधांवर आधारित हा निष्कर्ष आहे.

हे कागदपत्र त्या अमेरिकन शंकाच्या दरम्यान आले आहेत, ज्यामध्ये चीन दक्षिण समुद्र आणि हाँगकाँगसह आपल्या सीमांच्या अन्य भागात प्रादेशिक दाव्यांच्या विरूद्ध कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटादरम्यान वापर केला जात आहे.