2 पिल्लांना मारल्याचा अस्वलानं घेतला बदला, हल्ल्यात गेला दोघांचा जीव

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या पिल्लांवर कोणतंही संकट आलं की लगेच आई धावून जाते. पिलांना सुरक्षित ठेवून आलेलं संकट आपल्यावर घेत त्या संकटचा सामना करणारी आई. आई आणि पिलांमध्ये अनोखे नातं असतं. पिलांवर कोणी हल्ला केला तर त्याच्यावर धाऊन जात आपल्या पिलांचे रक्षण करते. असाच एक प्रकार राज्यातील बुलढाण्याच्या सोनाळा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आलेवाडी शिवारात घडला आहे. अस्वलीने जंगलात गेलेल्या दोन इसमांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना समोर आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी अस्वलीने दोघांवर हल्ला करून ठार केले. त्या घटनास्थळापासून काही अंतरावर अस्वलाच्या दोन पिलांवर कोणीतरी कुऱ्हाडीने वार करून त्यांना ठार मारले होते. पिलांना मारल्याचा बदला घेण्यासाठी पिलांच्या आईने या दोन व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केला. अस्वलीच्या या हल्ल्यामध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली.

बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा वनपरिक्षेत्रामध्ये गुरुवारी एका चीडलेल्या अस्वलीने जंगालत गेलेल्या दोघांवर हल्ला करून त्यांनी ठार केले. आपल्या पिलांनी मारल्याचा बदला घेण्यासाठी पिलांच्या आईने दोघांवर हल्ला करून त्यांना ठार मरले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गुरुवारी सकाळी शिवारातील अशोक मोतीराम गवते (वय-52) आणि माना बंडू गवते (वय 42) यांचा अस्वलीच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

सोनाळा वरिपरिक्षेत्रांतर्गत यणाऱ्या आलेवाडी शिवारातील अशोक गवते आणि माना गवते हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गावातील क्षेत्रामध्ये येत असलेल्या आलेवाडी नियत क्षेत्रात गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. अस्वलाने एका व्यक्तीचा पूर्ण चेहरा छिन्न-विच्छिन्न केला होता. यामुळे या चीडलेल्या अस्वली ने दोघांचा जीव घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळापासून 15 ते 20 फुटावर अस्वलीचे दोन आठ महिन्यांचे पिल्ले कुणीतरी कुऱ्हाडीने वार करून ठार केल्याच्या अवस्थेत दिसून आली. यामुळेच मादा अस्वलीने जंगलात गेलेल्या या दोघांवर हल्ला चढवला असावा असे बोलले जात आहेत. याप्रकरणी वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहचून पंचनामा करून आकोट व्याघ्र प्रकल्पामध्ये वन गुन्हा दाखल केला आहे. अस्वलाच्या पिलांची हत्या करून त्यांच्या नखाची तस्करी केली जात आहे. त्यामुळेच त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.