महसूल विभाग पुन्हा अँन्टी करप्शनच्या रडारवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सरकारला महसूल मिळवून देणाऱ्या महसूल विभागात लाच खोरीचे प्रमाण होते ते वाढत आहे. मागील महिन्यामध्ये पुण्यामधील दोन मोठे मासे अँन्टी करप्शनच्या जाळ्यात आडकले असतानाच आज जळगावमध्ये महसूल विभागातील लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे आज पकडण्यात आलेला लिपिक हा मंत्रालयातील महसूल विभागात कार्यरत असल्याने लाच खोरीचे जाळे मंत्रालयापर्य़ंत पसरले असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. आजच्या कारवाईमुळे महसूल विभाग पुन्हा एकदा अँन्टी करप्शनच्या रडावर आले आहे.

आजच्या कारवाईमुळे महसूल विभागातील लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.चालू वर्षामध्ये अँन्टी करप्शनच्या राज्यातील ८ विभागामध्ये ५३ सापळा करावाई करण्यात आल्या आहेत. यामध्ये १४ महसूल विभागातील आहेत. यावरुन महसूल विभागात लाचखोरीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी अँन्टी करप्शनच्या पथकाकडून केलेल्या कारवाईमध्ये महसूल विभाग टॉपवर होता. यंदाही केवळ तेवीस दिवसात करण्यात आलेल्या कारवाईत देखील महसूल विभागाने आपला पहिला नंबर टिकवून ठेवला आहे.
वर्षाच्या शेवटच्या आठवड्या पुणे लाचलुपत विभागाने केलेल्या कारवाईमध्ये दोन मोठे मासे गळाला लागले आहेत.

जमीनीवरील नावे कमी करुन देण्यासाठी एका वकिलाने तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्विकारली. २०१८ या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. हे प्रकरण ताजे असतानाच वारस नोंदणी कण्यासाठी मुळशीच्या तहसिलदाराला १ कोटीची लाच घेताना अटक करण्यात आली. या दोन घटनांमुळे महसूल विभागात खळबळ उडाली होती. ही प्रकरणे ताजी असतानाच आज जळगावमध्ये कारवाई करुन महसूल विभागातील एका लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले.

शहरांचे विस्तारीकरण होत असताना शहाराच्या परिसरातील जमीनींना कोट्यावधीचा भाव मिळत आहे. याच जमीन खरेदी विक्रीतून सरकारला कोट्यावधीचा महसूल मिळतो. हाच महसूल विभाग सध्या भ्रष्टाचाराने ग्रासला आहे. महसूल विभागात दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल तर होतेच त्याच तुलनेत लाचखोरी देखील होत आहे.अँन्टी करप्शनने आज जळगाव येथे केलेल्या कारवाईत बदली करण्यासाठी मदत केल्याच्या बदल्यात लिपिकाला पकडण्यात आले. एखादे सरकारी काम करण्यासाठी चिरीमिरीची अपेक्षा बाळगली जाते. आजच्या कारवाईमुळे महसूल विभागातील लाचखोरी मंत्रालयापर्यंत पोहचली असल्याचे दिसून येत असून याची पाळेमुळे खोदून काढणे अँन्टी करप्शन पुढे मोठे आव्हान आहे.