Kolhapur News : करवीर तहसिल कार्यालयाच्या इमारतीसाठी 15 कोटीचा निधी मंजूर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची माहिती

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर शहरातील करवीर तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मान्यता दिली असून त्याकरिता तब्बल 14 कोटी 98 लाख 82 हजार 4 86 रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे करवीर तहसिल कार्यालयास लवकरच सुसज्ज इमारत मिळणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

गेल्या अनेक वर्षापासून करवीर तहसिल कार्यालय आणि करवीर पोलीस ठाणे भाऊसिंगजी रोडवर एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे वाहतुकीकोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. कार्यालयास देखील खुरड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे सुसज्ज इमारतीत नविन तहसिल कार्यालय सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्याची दखल घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार आता निधी मंजूर झाला आहे. इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिल्याचा शासन निर्णय गुरुवारी (दि.4) निगर्मित केला आहे. याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यानी सहकार्य केल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

याच इमारतीतील करवीर पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी 73 लाख 23 हजार 898 इतका निधी गृविभागाकडून उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे गृहराज्यमंत्री ना. पाटील यांनी सांगितले.