छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत येवला आणि निफाड तालुक्याची आढावा बैठक संपन्न

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवला आणि निफाड तालुक्याची आढावा बैठक लासलगाव येथील शिवकमल मंगल कार्यालय येथे संपन्न झाली.

यावेळी निफाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप बनकर, किशोर दराडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष , मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रेवखंडे, निवासी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनंत पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, येवला प्रांत अधिकारी सोपान कासार,मनमाड पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सोनाग्रहा, उपअभियंता देवरे, उन्मेष पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजाराम, उपअभियंता प्रजापती, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला जिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यवंशी,येवला तहसिलदार प्रमोद हिले, निफाड तहसिलदार राहुल कोताडे, येवला तालुका आरोग्य अधिकारी हितेंद्र गायकवाड, निफाड तालुका आरोग्य अधिकारी चेतन काळे, गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख, संदीप कराड, सहायक निबंधक एकना थ पाटील, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, लासलगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे उपस्थित आहेत.

You might also like