‘या’ ब्राऊजरवरुन करा ‘सेफ’ सर्चिंग, नाही ‘स्टोर’ होणार ब्राऊजिंग ‘History’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेव्हा आपण स्मार्टफोन, डेस्कटॉपवर काही सर्च करत असतो, ब्राउजिंग करत असतो, तेव्हा आपल्याला एक भीती कायमच वाटत असते की कोणी आपल्याला ट्रॅक करेल किंवा सर्व इंफार्मेशन स्टोर तर होणार नाही. त्यासाठी काही असे ब्राऊजर आहेत जे ही माहिती सेफ ठेवतात.

डकडक गो –

हे गुगल सारखेच एक सर्च इंजिन आहे, परंतू आता हे अॅण्ड्राईड आणि आयओएस डिवाइससाठी प्रायवेट ब्राऊजर म्हणून उपलब्ध आहे. याची विशेषता आहे की यह ऑटोमॅटिकली थर्ड पार्टी कूकीज फाइल्सला ब्लॉक करण्यात येते. या प्रकारच्या ब्राऊजिंग दरम्यान वापरकर्त्यांना अॅड नेटवर्क पासून सुरक्षित ठेवतात. येवढेच नाही तर वापरकर्त्यांची ब्राऊजिंग सर्च संबंधित माहिती स्टोर देखील होत नाही.

घोस्टेरी –

जेव्हा तुम्ही वेब ब्राऊजिंग करतात, तर त्यात अनेक प्रकारचे डिजिटल फुटप्रिंट देखील राहून जातात. याचाच वापर करुन कंपन्या पाहू शकतात ही तुमचा ऑनलाइन वापर कसा आहे. जर अशा ट्रॅकिंग पासून वाचण्यासाठी घोस्टेरी ब्राऊजर आपली मदत करेल. यात फास्ट, सेफ आणि क्लीन ब्राऊजिंगचा उत्तम अनुभव मिळेल. हे सर्च इंजिन ट्रॅक करणाऱ्या ट्रॅकरला ब्लॉक करतात आणि त्यामुळे साइट वेगाने ओपन होतात.

रेड ऑनियन –

हे एक युनिक ब्राऊजर आहे, ज्याच्या मदतीने गुप्त पद्धतीने इंटरनेटचा वापर करता येऊ शकतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही अडचणीशिवाय इंटरनेट एक्सेस करु शकतात. यात बिल्ट इन डाऊनलोडर फिचर मिळतो. यात कुकीज ला डिलीट करण्यासाठी ऑटो क्लीन अप फिचर आहे. हे ब्राऊजर फक्त आयओएस डिवाईससाठी उपलब्ध आहे.

 

कोंढवा दुर्घटनेची सखोल चौकशी करा ; मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण

कडुबाई खरात यांच्यासह अनेक मातंग बांधव घेणार धम्मदीक्षा

‘हे’ ५ सोपे उपाय, ज्यामुळे तुमचे वजन होईल कमी

‘गवार’ खाल्याने अनेक आजारांवर राहते नियंत्रण