राज्यभरातील वाढीव वीज देयकांची फेरतपासणी करा : मुख्यमंत्री

पोलिसनामा ऑनलाईन टीम – ऐन कोरोनातही राज्यातील अनेक ठिकाणी उन्हाळ्यातील तीन महिन्यांचे वीज देयक एकत्र आल्यामुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी जनक्षोभ वाढत असल्यामुळे वाढीव वीज देयकांची 10 दिवसांत फेरतपासणी करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागाला दिला आहे.

वाढीव वीज देयकाबाबत उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षां निवासस्थानी बैठक झाली. वीज महामंडळाने वाढीव वीज देयकांची अचूकता तपासावी. संबंधित वीज ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी करावी. त्यानंतर प्रत्यक्षात नेमके किती निधीची गरज आहे, याचा लेखाजोखा मांडावा. त्यानुसार येत्या 10 दिवसांत वाढीव वीज देयकांची फेरतपासणी करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वीज वितरण कंपन्यांना दिला आला. त्यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.